लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह सफाई कामगारांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी आ. संग्राम जगताप यांच्यासह युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी नगरविाकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मंगळवारी निवदनाद्वारे केली.
आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मनपा कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर यांनी मुंबई येथे राज्यमंत्री तनपुरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची शिफारस व सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी, हे दोन्ही प्रस्ताव प्रशासनाने नगरविकास खात्याला यापूर्वीच पाठविलेले आहेत. मात्र, या प्रस्तावांना अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित आहेत. तसेच सफाई कामगारांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी दिली जात नाही. त्यामुळे सफाई कामगारांच्या वारसांवर उपासमारीची वेळ आली असून, या दोन्ही मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
..
सूचना फोटो आहे.