शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये सराफांचा जल्लोष

By admin | Updated: May 1, 2016 01:39 IST

अहमदनगर : सुवर्ण व्यवसायावर केंद्र सरकारने लागू केलेल्या अबकारी करास मद्रास उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने शहरातील सराफांनी जल्लोष साजरा केला़

अहमदनगर : सुवर्ण व्यवसायावर केंद्र सरकारने लागू केलेल्या अबकारी करास मद्रास उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने शहरातील सराफांनी जल्लोष साजरा केला़ शनिवारी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटत आनंद व्यक्त केला.केंद्र सरकारने देशातील सराफ सुवर्णकार व्यवसायावर अबकारी कर लावण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला होता़ या निर्णयाच्या विरोधात सर्व सराफ व्यावसायिकांनी विरोध करत आंदोलन केले़ सरकारने मात्र, काहीच निर्णय न दिल्याने सराफांनी २७ एप्रिलला संप मागे घेतला होता़ कोईम्बतूर सराफ संघटनेने मद्रास हायकोर्टात दाखल केलेल्या पिटीशनवर उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी शुक्रवारी सायंकाळी निर्णय देत या अबकारी करास ३ जूनपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे़ न्यायालयाच्या या निर्णयाचा सराफ संघटनांनी स्वागत केले आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे शहरात शुक्रवारी रात्री सराफ व्यावसायिकांनी स्वागत करून सराफ बाजारात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला़ यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष वर्मा म्हणाले, केंद्र सरकारने सराफ व्यवसायावर लादलेल्या अबकारी करास एकजुटीने विरोध केला. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने केली. मात्र, सरकारला जाग आली नाही. या संपादरम्यान कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान सरकारचे होत होते तरीही सरकारने योग्य न्याय दिला नाही. मात्र मद्रास हायकोर्टाने सराफ व्यावसायिकांनच्या भावना समजून घेत या अबकारी करास स्थगिती देऊन न्याय दिला आहे. सर्व सराफ व्यावसायिकांनी एकजुटीने व सहनशीलपणे या काळ्या कायद्यास विरोध केल्याने उशिरा का होईना पण न्याय मिळाला आहे, असे ते म्हणाले़ यावेळी सराफ संघटनेचे जिल्हा सचिव प्रमोद बुऱ्हाडे, अभय कांकरिया, प्रकाश डहाळे, अजय बोरा, बाळासाहेब काबरा, संतोष देडगावकर, गोपाल वर्मा, मुकुंद रत्नापूरकर व सराफ व्यावसायिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)