शिर्डी : साईबाबा संस्थानच्या साईबाबा रुग्णालयाच्या छताचे प्लॅस्टर सोमवारी दुपारी अचानक कोसळले. डॉक्टरांच्या केबीनबाहेर बसलेल्या रुग्णांनी पळ काढल्याने कुणालाही मोठी इजा झाली नाही. सोमवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास डॉ. अविनाश जाधववर व डॉ. गिरीष काळे यांच्या ओपीडीसमोरील छताचे प्लॅस्टर अचानक कोसळले. प्रथम प्लॅस्टर पंख्यावर पडल्याने मोठा आवाज झाला. याठिकाणी सुमारे पन्नास रुग्ण बसलेले होते. त्यांची मोठी पळापळ झाली. दरम्यान, या भागाची साईबाबा संस्थान बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. (शहर प्रतिनिधी)
साईबाबा रुग्णालयाचे प्लॅस्टर कोसळले
By admin | Updated: April 25, 2017 02:18 IST