शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

लॉकडाऊनमुळे साई, शनिमंदिर दर्शनासाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:19 IST

शिर्डी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या ब्रेक दी चेन या धोरणांतर्गत ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत साई मंदिर ...

शिर्डी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाच्या ब्रेक दी चेन या धोरणांतर्गत ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

राज्य सरकारने रविवारी रात्री कडक निर्बंध लागू केले. त्या अनुषंगाने संस्थानने साई मंदिरही ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली. साई संस्थानची भक्तनिवास व्यवस्थाही या काळात बंद असेल. प्रसादालय व कॅन्टीनसुद्धा बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसादालयात केवळ रुग्णालय व कोविड सेंटरच्या रुग्णांसाठीच जेवण बनविले जाणार आहे.

साई संस्थानच्या इतिहासात साथीचा संसर्ग रोखण्यासाठी तिसऱ्यांदा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे. १९४१ मध्ये कॉलराचा संसर्ग रोखण्यासाठी मंदिर ऐन रामनवमीत बंद ठेवण्यात आले होते. त्यावेळी शिर्डीत आलेल्या भक्तांना लस टोचण्यात आली. बाहेरून येणाऱ्या भाविकांना पोलिसांनी शिर्डीच्या शिवेवर अडवून तेथूनच परत पाठवले जात होते. यानंतर प्रथम कोरोनाचा संसर्ग सुरू होताच १७ मार्च २०२० पासून १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत मंदिर बंद ठेवण्यात आले. त्यानंतर १६ नोव्हेंबरला मंदिर पुन्हा सुरू झाल्यानंतरही २३ फेब्रुवारी २०२१ पासून दर्शनाच्या वेळा सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत कमी करण्यात आल्या. यामुळे पहाटेची व रात्रीची आरती भक्तांविना होऊ लागली. त्यानंतरही कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन २८ मार्च २०२१ पासून वेळेत आणखी कपात करून दर्शनाची वेळ सकाळी सव्वासात ते रात्री पावणेआठ करण्यात आली. यानंतर आता सोमवारी (दि. ५) रात्री आठ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत शासनाच्या ब्रेक दी चेन धोरणानुसार पुन्हा मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

--------शनिशिंगणापूरची गुढीपाडवा यात्रा रद्द

नेवासा : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाच्या 'ब्रेक द चैन' आदेश

म्हणून शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर सोमवारपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली. राज्याबरोबरच जिल्हा आणि तालुक्यात रोजच कोरोना रुग्ण वाढत आहे. हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन

देवस्थान विश्वस्त मंडळ, ग्रामपंचायत पदाधिकारी व पोलीस प्रशासनाने निर्णय घेऊन आज पहाटे साडेचार वाजता आरती सोहळा झाल्यानंतर महाद्वार परिसरात सरंक्षण कठडे टाकून मंदिरात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. १३ एप्रिल रोजी असलेली गुढीपाडवा यात्रा, उदासी महाराज पारायण सप्ताह रद्द करण्यात आला आहे. सोमवारी मंदिर बंद करण्यात आल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी आपले दुकानही बंद केले. बाहेरून आलेल्या भाविकांनी महाद्वारात लावलेल्या स्क्रीनवर शनिदेवाचे दर्शन घेतले.