रोटरीच्या पदग्रहण समारंभात अॅड. राजे बोलत होते. यावेळी नूतन अध्यक्ष डॉ. भारत गिडवानी, सचिव हरसुख पद्माणी, मावळते अध्यक्ष राजेश कुंदे, कामगार नेते अविनाश आपटे, सुरेश बनकर, नारायणभाई पटेल, अॅड. भागचंद चुडीवाल, पुरुषोत्तम मुळे, गंगाधर देशपांडे, अनिल पांडे, उज्ज्वला राजे, विशाल फोपळे, हेमा पद्माणी, डॉ. स्नेहा गिडवानी आदी उपस्थित होते.
श्रीरामपूर रोटरीचे काम प्रांतातील इतर क्लबच्या तुलनेत उत्कृष्ट आहे. या क्लबचा मूक-बधिर विद्यालयाचा प्रकल्प अव्वल दर्जाचा आहे. रोटरीने राबविलेले समाजिक, शैक्षणिक, आरोग्याचे उपक्रम कौतुकास्पद आहेत, असे अॅड. राजे म्हणाले. नूतन अध्यक्ष डॉ. भारत गिडवानी यांनी एक गाव दत्तक घेऊन तेथे सर्व सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. यावेळी कामगार रुग्णालयाचे विश्वस्त अविनाश आपटे यांच्याकडे आयसीयू विभागात ऑक्सिजन जनरेटर देण्यात आले. यावेळी नीलेश नागले, शशांक रासकर, प्रेमचंद नारा, सरबजितसिंग चुग, डॉ. सतीश भट्टड, प्रकाश चुग, डॉ. प्रशांत कदम, विनोद पाटणी, तिमिर दंड, महेश बंग, भाग्येश कोठावळे, जितेंद्र अग्रवाल, संतोष चापानेरकर, बाळासाहेब पटारे, नीलेश चुडीवाल, गणेश देशपांडे व उल्हास धुमाळ यांना मानाची पीन देण्यात आली. सुरेश बनकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शुभम केणेकर यांनी केले. आभार सचिव हरसुख पद्माणी यांनी मानले. अथर्व देशपांडे यांनी स्वागतगीत गायले.