चिलीया तुवर,
अध्यक्ष, वाळू बचाव समिती, पाचेगाव
-----------
गावाने रोखली वाळूचाेरी
निंभारी गावाने वाळू लिलावाच्या विरोधात ठराव केला आहे. अगोदर वाळूचोरीच्या घटना घडल्या आहेत. त्याला गावाने मोठ्या ताकदीने प्रतिकार केला आहे. वाळूचोरी रोखण्यासाठी गावाने पुढाकार घेतला आहे. येथून वाळू चोरीला जात नाही. गावातील बांधकामांना मात्र वाळू दिली जाते. महसूल प्रशासनाचेही सहकार्य मिळते.
-भागीरथी पवार, सरपंच, निंभारी, ता. नेवासा
------
वाळूचोरांकडून गावकऱ्यांना दमदाटी, मारहाण
ग्रामसभेचा वाळू लिलावास विरोध असूनही गावात वाळूचोरीच्या घटना घडत आहेत. महसूल प्रशासनाला संपर्क अथवा तक्रार केल्यानंतरच कारवाई केली जाते. वाळूचोरी करणारे लोक गुंड प्रवृत्तीचे आहेत. वेळप्रसंगी नागरिकांना धमकावले जाते. मारहाणीचे प्रकार घडतात. वाळू हा विषय आमच्या अखत्यारित येत नाही, असे पोलीस सांगतात.
- सुदर्शन वाकचौरे, सरपंच, पुनतगाव, ता.नेवासा