येथील अगस्ती विद्यालयात अगस्ती शिक्षण संस्थेचे संस्थापक गुरुवर्य बा.ह. नाईकवाडी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थान योगी केशवबाबा चौधरी होते.
देशमुख म्हणाले, आदर्श समाज निर्माणासाठी शिक्षकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यानंतर असे शैक्षणिकदृष्ट्या गौरवपूर्ण शिक्षक व विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम ज्यांंनी केले त्यात स्वतंत्र सेनानी गुरुवर्य बा.ह. नाईकवाडी यांचे नाव आदराने घेतले जाते. नाईकवाडींसारखी अवलिया माणसेच समाजासाठी प्रेरणास्रोत आहेत. संस्थेचे कार्यवाहक सतीश नाईकवाडी यांनी प्रास्ताविक केले. स्वागत प्राचार्य गीताराम अभंग यांनी केले, तर सूत्रसंचालन हरीश आंबरे यांनी केले. संस्थेच्या अध्यक्ष शैलजा पोखरकर, शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, सचिव दुर्गाबाई नाईकवाडी फेसबुक लाइव्ह सहभागी होत्या. निवृत्त प्राचार्य संपत नाईकवाडी, व्ही.एस. गायकवाड, शिवाजी धुमाळ, सुजल गात, विठ्ठल शेवाळे, बाळासाहेब चौधरी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते. एस.बी. शिंदे यांनी आभार मानले.