युवा मोर्चाच्या वतीने गुरुवारी नगरपालिका प्रशासनाला यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या वेळी युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सतीश सौदागर, शहराध्यक्ष मारुती बिंगले, बंडूकुमार शिंदे, अजित बाबेल, साजिद शेख, मिलिंदकुमार साळवे उपस्थित होते.
शहरातील नेवासा-संगमनेर रस्ता, लक्ष्मी टॉकीजसमोरील रस्ता, मौलाना आझाद चौक ते गोंधवणी रस्ता, बेलापूर रोड येथील सिद्धिविनायक मंदिर ते भळगट हॉस्पिटल रस्ता ही कामे गेल्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांची कामे झाली. मात्र रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने पुन्हा खड्डे पडले आहेत. शासकीय नियमाप्रमाणे कोणत्याही रस्त्याचे काम पूर्ण केल्यावर किमान ३ वर्षे रस्ता सुस्थितीत असावा लागतो. मात्र सहा महिन्यांत बोजवारा उडाला आहे. संबंधित ठेकेदारांनी करारनाम्याचा भंग केला आहे. ठेकेदारांना सत्ताधारी व प्रशासन पाठीशी घालत आहे, असा आरोप वर्पे यांनी केला.
निकृष्ट कामांची चौकशी करून ठेकेदारांवर कारवाई करावी अन्यथा नगरपालिका गेटबंद आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस विशाल यादव, जिल्हा उपाध्यक्ष रूपेश हरकल, जिल्हा सचिव अक्षय नागरे, हंसराज बतरा, विशाल अंभोरे, श्रेयस झिरंगे, आनंद बुधेकर, विजय आखाडे, गणेश बिंगले, वैभव ढवळे या वेळी उपस्थित होते.
----
फोटो श्रीरामपूर
ओळी : शहरातील गोंधवणी रस्त्याची झालेली ही दुरवस्था.