शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तांदळे टोळीने बनविले होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:18 IST

अहमदनगर : कुप्रसिद्ध नयन तांदळे व त्याच्या साथीदारांनी पोलिसाच्या नावे बनावट ओळखपत्र तयार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा ...

अहमदनगर : कुप्रसिद्ध नयन तांदळे व त्याच्या साथीदारांनी पोलिसाच्या नावे बनावट ओळखपत्र तयार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महेश साहेबराव ससे (रा. जेऊर, ता. नगर) यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी नयन तांदळे व त्याच्या साथीदारांविरोधात चोरी, बनावटीकरण या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तांदळे व त्याच्या साथीदारांनी २१ डिसेंबर २०२० रोजी महेश ससे यांचे नगर-मनमाड रोडवरील एका चहाच्या टपरी जवळून पाकीट चोरले होते. पाकिटात असलेल्या ससे यांच्या फोटोचा गैरवापर करून त्याचे पोलीस विभागाचे बनावट ओळखपत्र तयार केले.

दरम्यान, तांदळे याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात नुकताच मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे करीत आहेत. तपासादरम्यान तांदळे टोळीने पोलीस विभागाच्या नावे बनावट ओळखपत्र तयार केले असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून ससे यांचे चोरलेले एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड आधी मुद्देमाल जप्त केला. पोलिसाचे बनावट ओळखपत्र तयार करून तांदळे टोळीने काय गुन्हे केले आहेत, याचा तपास उपअधीक्षक मिटके हे करीत आहेत. यातून आरोपींचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्‍यता मिटके यांनी वर्तविली.