शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपुरात पुन्हा टोळीयुद्ध

By admin | Updated: March 20, 2016 00:48 IST

श्रीरामपूर : श्रीरामपुरात पुन्हा टोळीयुद्धाने डोके वर काढले आहे. शुक्रवारी रात्री २० जणांनी मिळून दोघांना जबर मारहाण केली.

श्रीरामपूर : श्रीरामपुरात पुन्हा टोळीयुद्धाने डोके वर काढले आहे. शुक्रवारी रात्री २० जणांनी मिळून दोघांना जबर मारहाण केली.कांदा मार्केटमध्ये जनावरांच्या दवाखान्याशेजारी राहणारे राजू कृष्णा वायकर व त्यांच्या साथीदारास मोटारसायकलवरून आलेल्या सुमारे २० आरोपींनी सोन्याभाऊ जेलमध्ये असल्यामुळे तू शिवजयंती साजरी करायची नाही, असे म्हणून धारदार शस्त्राने हल्ला चढवून जखमी केले. शुक्रवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी साखर कामगार रूग्णालयात दाखल केले. शिवजयंती उत्सव साजरा करण्याच्या तयारीत असताना त्यापूर्वीच टोळी युध्दाने पुन्हा डोके वर काढले. वायकर यास व त्याचा साथीदार शिवाजी बापू शिंदे यास झालेल्या मारहाणीच्या घटनेत दोन दुचाकी तोडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ९.३० च्या सुमारास आरोपी गोविंद पवार, मयूर विष्णू जाधव, पंकज मतिक, अमोल लोडे, अशोक चव्हाण, निखिल सांगळे, गणेश विवेक जाधव, सागर शेटे, अजिंक्य दिनकर काथे, महेश शर्मा व राकेश पाटील आदी ११ जणांसह अन्य १० -१२ अनोळखी तरूण जमले होते. यावेळी वायकरच्या घरासमोर राजू अंबादास भोसले (रा.ब्राम्हणी, ता.राहुरी) हा उभा होता. आरोपींनी दोघांना तुला समजत नाही काय? सोन्याभाऊ तुरुंगात असताना शिवजयंती साजरी करायची नाही, असे म्हणत राजू भोसले यास लोखंडी रॉड, लाकडी दांडके व धारधार शस्त्राने वार करुन जखमी केले. तसेच शिवाजी बापू शिंदे यांच्या घरात घुसून त्याच्यावरही शस्त्राने वार करुन जखमी केले. दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वायकर मारहाण प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र पडवळ व फौजदार भोळे यांनी घटनास्थळी जाऊन बंदोबस्त वाढविला. आरोपी महेश विश्वकर्मा, गणेश जाधव, मयूर जाधव, अमोल लोडे, अजिंक्य काथे या ५ जणांना अटक केली. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास फौजदार भोळे करीत आहेत. (वार्ताहर)