शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीचा लग्नास नकार : प्रियकराची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 10:48 IST

प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने विषारी औषध घेत आत्महत्या केली. संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे ही घटना बुधवारी घडली.

तळेगाव दिघे : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने विषारी औषध घेत आत्महत्या केली. संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे ही घटना बुधवारी घडली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवाशी असलेला अमित अशोक मिंडे हा युवक राजगुरूनगर (ता. खेड, जि. पुणे) याठिकाणी एका खाजगी रुग्णालयात एमआरआय टेक्निशियन या पदावर नोकरी करीत होता. याच रुग्णालयात बीएचएमएसचे शिक्षण असलेली एक डॉक्टर तरुणी नोकरी करीत होती. एकाच रुग्णालयात नोकरीस असल्याने दोघांचे प्रेमसबंध जुळले होते. दरम्यान मंगळवारी (दि. ५) डॉक्टर तरुणी तिच्या घरी आली होती. तिच्या समवेत अमित मिंडे हा देखील आला होता. मात्र तरुणीने अमितला लग्नास नकार दिला. प्रेमभंग झालेल्या अमित मिंडे याने मोबाईलवरुन कुटुंबियांशी संपर्क साधत घडला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर कौठेकमळेश्वर शिवारात अमितने डाळींब बागेत विषारी औषध सेवन करून आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास काही महिला सरपण काढण्याच्या निमित्ताने गेल्या असता त्यांना मृतदेह आढळून आला. डाळींब बागेनजीक दुचाकी आढळून आली. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक अश्विनी टिळे, लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. आत्महत्येपूर्वी अमित मिंडे याने फोनकरून कुटुंबियांना या सर्व प्रकाराची माहिती दिली होती, असे पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी सांगितले. याप्रकरणी मयताचा भाऊ सुधीर अशोक मिंडे याने पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर