विद्यार्थांनी २३ जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे, अशी माहिती प्राचार्य ए.आर. मिरीकर यांनी दिली.
दहावीचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. याबाबत ऑनलाईन नोंदणी करतेवेळी बोर्डाकडून प्राप्त झालेला आसन क्रमांक द्यायचा आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य केलेली आहे. मात्र पाॅलिटेक्निक प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची सीईटी नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक तणाव राहिलेला नाही.
उमेदवारांच्या जातीनिहाय संवर्गानुसार आवश्यक कागदपत्र व इतर माहितीसाठी या केंद्रातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तज्ञ प्राध्यापकांची त्याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती प्रा. मनोज गायकवाड यांनी दिली.
----