शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी रोहोकलेंकडून दिशाभूल : रविंद्र पिंपळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 13:23 IST

अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला भांडवली तोटा साडेतीन कोटी रुपये झाला असून रिझर्व बँकेने संचालक मंडळावर निर्बंध घातले आहेत. निर्बंधाचे पाप हे पुर्वीच्या सत्ताधा-यामुळे आले असल्याचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी सांगितले. तर बँकेवरील निर्बंधाबाबत रोहोकले दिशाभूल करत असून निर्बंध का लागले याचा सविस्तर खुलासा करावा.

ठळक मुद्देबँक फक्त रोहोकले व ठुबे घराण्यासाठी चालते काय ?शिक्षक बँकेस तोटा नाही, तर दोन कोटींचा नफा - रावसाहेब रोहोकले 

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला भांडवली तोटा साडेतीन कोटी रुपये झाला असून रिझर्व बँकेने संचालक मंडळावर निर्बंध घातले आहेत. निर्बंधाचे पाप हे पुर्वीच्या सत्ताधा-यामुळे आले असल्याचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी सांगितले. तर बँकेवरील निर्बंधाबाबत रोहोकले दिशाभूल करत असून निर्बंध का लागले याचा सविस्तर खुलासा करावा. तसेच कर्मचा-यांच्या रजेचा पगार, मेहनताना बंद करण्याच्या निर्णय घेताना रोहोकले संचालक होते. त्यामुळे रोहोकले यांनी त्यांच्या अपयशाचे खापर सदिच्छा मंडळावर फोडू नये, अशी टीका सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पिंपळे यांनी केली. यामुळे बँकेच्या तोट्यावरून सत्ताधारी व विरोधक आमने -सामने आले आहेत.जिल्हा प्राथमिक बँकेला भांडवली तोटा साडेतीन कोटी झाला असून रिझर्व बँकेने संचालक मंडळावर निर्बंध घातले आहेत. हे सर्व चेअरमन रावसाहेब रोहोकले यांच्या नाकर्तेपणामुळे झाले आहे. सत्ता आल्यापासून मनमानी व हेकेखोर पध्दतीने बँकेचा कारभार रोहोकले करत असून कोणालाही विश्वासात न घेता काम करत आहेत. त्यांच्या या सवयीमुळे शिक्षक बँकेवर ही वेळ आली असून स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी सदिच्छा मंडळाच्या माजी संचालकांची बदनामी करण्याची जुनी सवय रोहोकले यांना असल्याची टीका सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पिंपळे यांनी केली आहे. प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत त्यांनी रोहोकले यांच्या कार्यपध्दतीवर टीका केली आहे.शिक्षक बँकेला प्राप्त झालेले रिझर्व बँकेचे पत्र रोहोकले यांनी प्रसिध्दीस दिले नाही. निर्बंध का लावण्यात आले याचा सविस्तर खुलासाही केला नाही. सदिच्छा मंडळाची सत्ता असताना सभासदांच्या मागणीनुसार कर्मचा-यांच्या रजेचा पगार, मेहनताना बंद करण्याचा निर्णय बँकेची काटकसर करण्यासाठी घेतला होता. त्यावेळी रावसाहेब रोहोकले हेच संचालक होते. त्यावेळी त्यांचे समर्थक उपोषण करत होते. त्यामुळे मागील संचालकांनी रजेच्या पगाराची तरतूद न केल्यामुळे रिझर्व बँकेने निर्बंध आणल्याचा रोहोकले यांना साक्षात्कार झाला काय ?बँकेच्या ठेवी वाढल्याचे रोहोकले मोठ्या आवेशाने सांगतात. नोटाबंदीच्या काळात अनेक पतसंस्थाच्या ठेवी नोकरदाराच्या बँकेमध्ये आल्या आहेत. हे मान्य नसेल तर चेअरमन रोहोकले यांनी बँकेच्या ठेवी वाढवणा-या संचालकांची यादी स्वत: गोळा केलेल्या ठेवीसह पारदर्शकपणे जाहीर करावे. यात सभासदांच्या कायम ठेवी कर्मचा-यांनी गोळा केलेल्या ठेवी यांच्या विभागणीसह दाखवावी. बँकेचे चेअरमन रोहोकले ज्यांना गुरु मानून बँक चालवतात त्या गुरूच्या सल्ल्यामुळे पारनेर तालुक्यातील एक पतसंस्था बुडालेली आहे. रोहोकले यांनी व्यक्ती दोषाचे राजकारण चालवले आहे. त्यांनी दिलेला कारभार बँकेचा व सभासदांच्या हिताचा नाही. त्यामुळे कारभाराची चौकशी करण्याची मागणी डीडीआर यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे जिल्हा संघाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे असल्याचे सांगितले. मोहन शिंदे, राजेंद्र कुदनर, ज्ञानेश्वर माळवे, सुभाष खेडकर, प्रदीप खिलारी, बाबा आव्हाड, शैलेश खणकर, सय्यद अली, माधव हासे, भास्कर कराळे, भागवत खेडकर, संजय त्रिभुवन, विजय चितळे, कैलास वर्पे, भाऊसाहेब वाकचौरे, कारभारी बाबर, संतोष टकले, सुरेश खेडकर, रावासाहेब गोर्डे, संगिता कदम, बेबीताई तोडमल, सविता देशमुख, गोवर्धन ठुवे, विजय बेहळे, परशुराम आंधळे हे बँकेच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी करणार आहेत.बँक फक्त रोहोकले व ठुबे घराण्यासाठी चालते काय ?अशोक ठुबे कर्मचा-याला सेवानिवृत्तीनंतरही रजेच्या पगाराचा लाभ दिला. हे कारण निर्बंधाचे आहे. बँकेत द.मा.ठुबेंचा चिरंजिवाला सेटलमेंट करुन पुन्हा सेवेत घेतले गेले. त्यामुळे बँक फक्त रोहोकले व ठुबे घराण्यासाठी चालवली जाते काय ? असा प्रश्न पिंपळे यांनी उपस्थित केला आहे.

शिक्षक बँकेस तोटा नाही, तर दोन कोटींचा नफा - रावसाहेब रोहोकले अहमदनगर : बँकेस कर्मचा-यांचे रजेचे पगार देणे बंधनकारक असतात. मात्र, मागील सत्ताधा-यांनी कर्मचाºयांचे रजा पगार देण्याची तरतूद केली नाही. त्यामुळे २०१५ मध्ये शिक्षक बँकेस आरबीआयने २ कोटी ४१ लाख रुपयांच्या रजा पगाराची तरतूद करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यावेळी बँकेस १ कोटी ९५ लाखांचा तोटा दाखविला होता. २०१७ पर्यंत कर्मचा-यांच्या रजा पगाराची तरतूद आम्ही केली नाही. २०१७ मध्ये बँकेची तपासणी झाली. रजा पगाराची तरतूद नसल्यामुळे पुन्हा आरबीआयने बँक ३ कोटी ५५ लाख रुपये तोट्यात दाखविली व बँकेवर निर्बंध लादले. पण बँक ख-या अर्थाने तोट्यात नसून, २ कोटी २० लाख रुपयांचा बँकेस नफा झाला आहे. आम्ही सभासदांच्या हितासाठीच काम केले, असा दावा बँकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी केला.‘शिक्षक बँकेला साडेतीन कोटी रुपयांचा तोटा’ अशा मथळ्याखाली गुरुवारी वर्तमानपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्या पार्श्वभूमीवर रोहोकले यांनी शिक्षक बँकेच्या सभागृहात शनिवारी पत्रकार परिषद घेतली. आरबीआयने शिक्षक बँकेवर आणलेल्या निर्बंधाविषयी बोलताना रोहोकले म्हणाले, बँकेने आरबीआयच्या सुचनेनुसार मार्च २०१८ मध्ये एलआयसीची पॉलिसी घेतली आहे. त्यानुसार कर्मचा-यांना रजेचा पगार दिला जाणार आहे. मात्र, हा पगार केवळ ३०० दिवसांचा दिला जाणार आहे. त्याबाबत आरबीआयशी बँकेने पत्रव्यवहार केला असून, निर्बंध उठविण्याची मागणी केली आहे. बँकेने सभासदांच्या मागणीनुसार कर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. त्यात सभासदांचे हित हाच आमचा हेतू होता. कर्जमर्यादा वाढविली आहे. बँकेच्या ठेवीत २२० कोटींची वाढ झाली असून, सध्या बँकेकडे ७५० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. गुंतवणुकीत ९८ कोटींनी वाढ केली असून, सध्या २५७ कोटी रुपयांची बँकेने गुंतवणूक केली आहे, असे रोहोकले यांनी सांगितले. यावेळी संचालक सलीमखान पठाण, किसन खेमनर, साहेबराव अनाप, नानासाहेब बडाख, बाळासाहेब मुखेकर, शरद सुद्रिक, संतोष दुसुंगे, संतोष अकोलकर, सीमाताई निकम, उषाताई बनकर, राजू रहाणे, दिलीप औताडे, बाबासाहेब खरात, गंगाराम गोडे, शिक्षकनेते बापूसाहेब तांबे, संजय शेळके, आबासाहेब जगताप, विठ्ठल फुंदे, रावसाहेब सुंबे, श्रीकृष्ण खेडकर, आऱ के.ढेपले, निलकंठ धायतडक, दत्ता कुलट, अरुण आवारी, बाळासाहेब सहाणे, कैलास दौड, सु़ प़ वांढेकर, नवनाथ भापकर, राम निकम, संजय शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर