आंबित परिसरातील हेंगाड वाडी, दाभाळीची वाडी, पायळी, कळकीची वाडी आदी पाच वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांचा रेशनिंग धान्य मागील अनेक वर्षांपासून आंबित या गावातूनच होत आहे. हे धान्य मिळविण्यासाठी या लाभधारकांना नदीपात्र तर ओलांडावे लागतेच, पण या बरोबरच डोंगरदऱ्यांची चढण-उतरण करावी लागत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना एकीकडे वृद्धांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला दिला जात आहे, तर दुसरीकडे जीवन चरितार्थ चालविण्यासाठी ही पायपीट या वाड्यांच्या नागरिकांच्या नशिबी आली आहे. ही फरफट टाळण्यासाठी गावातील दुकान विभक्त करून वाडी-वस्त्यांवर धान्य पुरवठा करावा अशी मागणी जोर धरत आहे.
वाडी-वस्तीवर धान्य वितरणाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे केली असल्याचे सरपंच पथवे यांनी सांगितले.