शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत सुरु असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2017 16:22 IST

उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे़ दरम्यान गुरुवारी मन्याळे ग्रामस्थ, शिवसेना, भूमीपुत्र शेतकरी संघटना, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले़

आॅनलाईन लोकमतअकोले (अहमदनगर), दि़ ११ - तालुक्यातील मन्याळे गावातील भैरवनाथ शंकर जाधव हा शेतकरी आपल्याच शेतातील कोरड्या विहिरी उपोषणला बसला असून या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे़ दरम्यान गुरुवारी मन्याळे ग्रामस्थ, शिवसेना, भूमीपुत्र शेतकरी संघटना, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले़गुरुवारी दुपारी कोल्हार घोटी राज्य मार्गावर झालेल्या या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मन्याळे येथील शेतकरी जाधव यांच्या उपोषणावर शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत तोडगा न निघाल्यास जिल्हा निबंधक कार्यालयास टाळे ठोकण्याचा व जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद करण्याचा इशारा मराठा महासंघाचे प्रमुख संभाजी दहातोंडे यांनी दिला आहे. शिवसेनेचे सतिष भांगरे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, संभाजी ब्रिगेडचे डॉ. संदिप कडलग, महेश नवले, विनोद हांडे, राज गवांदे यांची भाषणे झाली.दरम्यान उपोषण थांबवावे यासाठी तहसिलदार यांच्या दालनात रास्तारोको आंदोलन संपण्यापूर्वी दुपारी यशोमंदिर पतपेढीचे अध्यक्ष, संचालक व अधिकारी यांनी तहसीलदार मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके, सहायक निबंधक कांतीलाल गायकवाड यांच्याशी चर्चा केली. यशोमंदिर पतपेढीचे अध्यक्ष अशोक वाळुंज, संचालक बी. आर. आरोटे, बाबुराव गायकर, भानुदास आरोटे, योगेश आरोटे, शिवाजी फणसे, सरव्यवस्थापक हरिभाऊ गायकर, शाखाधिकारी पांडुरंग गाजरे, दिनकर गायकर, वसुली अधिकारी सुरेश आरोटे, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे निलेश तळेकर, मिनानाथ पांडे, भैरवनाथ जाधव यांचे बंधू श्रीधर जाधव, मुलगा योगेश जाधव हे उपस्थित होते. सायंकाळपर्यंत उपोषण प्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता आहे. शुक्रवारी उपोषण सुरु राहिल्यास ‘आसुड’ शेतकरी संघटनेचे आमदार बच्चु कडू मन्याळे येथे येणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.