शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

पाणलोटात पावसाची विश्रांती

By admin | Updated: August 21, 2014 22:56 IST

अकोले : भंडारदरा व निळवंडे धरण पाणलोटात पावसाने उघडीप दिल्याने भंडारदरा जलाशयाच्या पाणीसाठ्यात घट दिसू लागली आहे.

अकोले : भंडारदरा व निळवंडे धरण पाणलोटात पावसाने उघडीप दिल्याने भंडारदरा जलाशयाच्या पाणीसाठ्यात घट दिसू लागली आहे. त्यामुळे विद्युत निर्मिती पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.धरण पाणलोटात पावसाने उघडीप दिली असून घाटघर, रतनवाडी, पांजरे, भंडारदरा, वाकी या पावसाच्या भागात बुधवारी पर्जन्यमानाचा आकडा निरंक होता. सध्या डोंगरदरीतून ओघळणारे चंदेरी प्रपात कड्याकपारीच्या कुशीत गुडूप झाले आहेत. २४ तासात केवळ १७ द.ल.घ.फू. नव्या पाण्याची आवक झाली. विद्युत निर्मितीसाठी ८१० क्युसेकने पाणी सोडले जात होते. त्यामुळे पाणीसाठा घटला असून बुधवारी सकाळी ६ वाजता वीज निर्मितीसाठी पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. आता निळवंडेत धरणातील पाण्याची आवकही घटली आहे. शेती आवर्तन सोडण्यात आले तर निळवंडे भरण्याची आशा धुसर झाली आहे. हरिश्चंद्रगड परिसरातही पावसाने उघडीप दिल्याने मुया नदीचा विसर्ग केवळ ५६१ क्युसेक होता. दरम्यान मंगळवारी कळस, गणोरे, अकोले शहर परिसरासह इंदोरी, मेहेन्दुरी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाडा सहन करणाऱ्या अकोलेकरांना सायंकाळी जोरदार पावसांच्या सरींनी झोडपले. कळस व गणोरे भागात धुवॉंधार पाऊस बरसला, तर अकोले इंदोरी भागात जवळपास तासभर पावसाची रिमझिम सुरु होती. मंगळवारी अकोले ६, कोतूळ २०, निळवंडे ९,आढळा १ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत निळवंडेत १११ तर आढळा धरणात ७ द.ल.घ.फू. पाण्याची आवक झाली. भंडारदरा- १० हजार ८०३, निळवंडे-५ हजार ९२४, तर आढळा -७२८ द.ल.घ.फू. पाणीसाठा झाला आहे. लाभक्षेञात शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरत असून, दोन- तिन दिवसात आवर्तन सुटण्याची शक्यता आहे. या आवर्तनात किमान एक ते दीड टी.एम.सी. पाणी वापरले जाण्याची शक्यता असल्याने निळवंडे ‘ओव्हर फ्लो’ ची आशा धुसर झाली आहे. शेती आवर्तनाबाबत अद्याप आदेश मिळाले नसल्याचे जलसंपदाच्या वतीने सहाय्यक अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले.