राहुरी : दक्षिण जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रावर रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली़ मुळानगर येथेही पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़रोहिणी, मृग व आर्द्रा या नक्षत्रांनी मुळा धरणाकडे पाठ फिरविल्याने पाण्याच्या पातळीत थेंबभरही वाढ झालेली नाही़ रविवारपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले असून, ७ ते १३ जुलै यादरम्यान मुळा धरणावर पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे़ त्यामुळे सर्वांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़२६००० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या केवळ ५०९ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे़ पाणीपातळी १७५४़६० फूट इतकी आहे़ धरणात मृतसाठ्यासह ५००९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे़ (तालुका प्रतिनिधी)सोमवारपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पाऊस अनुकूल असण्याची शक्यता आहे़ रविवारी पडलेल्या पावसाचे पाणी पाणलोट क्षेत्रावरच मुरले़ त्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही़ ११० मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर धरणाकडे पाण्याचा प्रवाह सुरू होणार आहे़ आगामी काळात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी अपेक्षित आहेत़
मुळा धरणावर पावसाचे आगमन
By admin | Updated: July 7, 2014 00:34 IST