शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

भंडारदरा-मुळा धरण पाणलोटात पाऊस पुन्हा सक्रिय

By admin | Updated: July 29, 2014 01:04 IST

अहमदनगर : ‘श्रावण मासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे’

अहमदनगर : ‘श्रावण मासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे’ या काव्याच्या ओळी प्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी नगर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती कायम आहे. मुळा आणि भंडारदरा धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांच्या पुढे गेला एवढीच जमेची बाजू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १८ ते २० टक्के पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)सोमवारी नोंदविलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या काळात ४९७.४ मिमीच्या सरासरीने ६ हजार ९६३ पाऊस पडत असतो. आतापर्यंत ८८.२१ मिमीच्या सरासरीने १ हजार २०६ पाऊस झालेला आहे. पावसाची ही टक्केवारी अवघी १७ टक्के आहे. सोमवारी जामखेड १०, कर्जत ३, पाथर्डी २८, शेवगाव २१, नगर २ , नेवासा २५ झालेला आहे.धरण साठे (दशलक्ष घनफुटात)मुळा ८ हजार ११३ (३१.२० टक्के), भंडारदरा ३ हजार ६२९ (३१.२० टक्के), निळवंडे ८३४ (१६ टक्के), आढळा १४७ (१३. ८७टक्के), मांडओहळ५४.९८ (१३.७८ टक्के), घोड १८१८ (२३. ८० टक्के), खैरी १७. ६ (३.२० टक्के), सीना ३१ (१.२९ टक्के), घाटशिरस निरंक मुळात पाण्याची आवकधरणाच्या पाणलोटात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने मुळा धरणात ३२१२ क्युसेक वेगाने आवक सुरू आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळीधरणात ८३०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला. सोमवारी दिवसभर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर ढगाळ वातावरण होते़ गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडिप दिली होती. परंतु सोमवार सकाळपासून संततधार पावसाला सुरूवात झाली. मुळा धरणात आतापर्यंत झालेल्या पाणीसाठ्यात वर्षभराचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे़ अजून समाधानकारक पावसाने हजेरी लावली तर शेतीसाठीही आवर्तन उपलब्ध होऊ शकते़ धरणातील साठा १३ टीएमसीच्या पुढे गेल्याशिवाय शेतीसाठी आवर्तन सोडणे अशक्य आहे़ घाटघर, हरिश्चंद्रगड परिसरात पाऊसअमृतवाहिनी प्रवरा नदीच्या उगमस्थानी असलेल्या अमृतेश्वर शिवालय परिसरासह घाटघर व हरिश्चंद्रगड आदिवासी भागात श्रावणसरींचा अभिषेक सुरु झाला आहे. गुरुवारपासून रजेवर गेलेला पाऊस सोमवारी पुन्हा सक्रिय झाला. डोंगरदरीतील ओढे-नाले खळखळत असल्याने बलठण, घाटघर, वाकी,आंबीत, कोथळे व शिळवंडी लघूपाटबंधारे तलाव ओसंडून वाहत आहेत. गेल्या चोविस तासांत भंडारदरा धरणात ११३, तर निळवंडेत ३४ दशलक्ष घनफूट नव्या पाण्याची आवक झाली आहे. बलठण व कोथळा तलावातून २०० क्युसेक, तर वाकीतून १९७ क्युसेक पाणी विसर्ग सुरूआहे. रविवारचा पाऊस व कंसात यावर्षी पडलेला एकूण पाऊस मिलीमिटरमध्ये घाटघर- ६१(१३१०), रतनवाडी- ६३ (१५६२), पांजरे १५ (७७७), वाकी- १४ (६६२), भंडारदरा- १६ (६३१), कोतूळ १ (११४), निळवंडे- १(१३६), आढळा- ०(३३), अकोले- ० (७०) पाऊस पडला. अकोले, इंदोरी, बहिरवाडी परिसरात गुरूवारी दिवसभर श्रावणसरी कोसळत होत्या. आढळा खोऱ्यातही पावसाचा जोर थोडा वाढला आहे. हरिश्चंद्रगड परिसरात पावसाचा जोर कमी झाला असून मुळा नदीपात्रातून ३ हजार ३१२ क्युसेक इतका पाणी विसर्ग सुरू आहे.