अहमदनगर : येथील प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी ‘राम भक्त हनुमान’ हा चरित्रग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाचे प्रकाशन नगर येथे गुरुकुल भागवताश्रमाचे कुलगुरू ह. भ. प. भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उषा सहस्त्रबुद्धे उपस्थित होत्या. गंधर्व वेद प्रकाशन पुणे यांनी सप्तचिरंजीव ग्रंथमाला संच प्रकाशित केली आहे. ‘राम भक्त हनुमान’ या चरित्रग्रंथात हनुमानांचे व्यक्तिमत्त्व आणि तिथीवार, नक्षत्रासह महत्त्वाच्या घटना यावर संशोधनात्मक प्रकाश पडला आहे. सप्तचिरंजीव ग्रंथमालेचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे, असे कर्डिले म्हणाले.
---
--
फोटो- ०१ रामभक्त
प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेल्या ‘राम भक्त हनुमान’ हा चरित्रग्रंथाचे प्रकाशन नगर येथे अशोकानंद महाराज कर्डिले यांच्या हस्ते झाले. समवेत उषा सहस्त्रबुद्धे, आदी उपस्थित होते.