शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसुरक्षेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

राशीन : ग्रामसुरक्षेसाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. लोकसहभागातून कोणतेही मोठे काम सहज पार पडू शकते. खेडच्या नागरिकांनी ...

राशीन : ग्रामसुरक्षेसाठी आता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. लोकसहभागातून कोणतेही मोठे काम सहज पार पडू शकते. खेडच्या नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवत बॅरिकेड‌्सच्या माध्यमातून सामाजिक योगदान दिले आहे. आपला गाव आदर्श करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे मत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले.

यादव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खेड येथे धनंजय मोरे व उद्योजक नीलेश निकम यांनी दिलेल्या प्रत्येकी ४ अशा एकूण ८ बॅरिकेड‌्सच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी पं.स. सदस्य अण्णासाहेब मोरे, उपसरपंच सचिन मोरे, सोमनाथ वाघमारे, बाळासाहेब मोरे, लक्ष्मण कांबळे, पोपट मोरे, डॉ. विक्रम मोरे, उद्योजक नीलेश निकम, डॉ. वसंत साळुंके, धनंजय मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

यादव म्हणाले, कर्जत पोलिसांनी राबविलेल्या अनेक प्रभावी उपक्रमांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या एका फोन कॉलवर अडचणीत असलेल्या कुटुंबांना रात्री-अपरात्री शेकडो तरुणांची मदत होत आहे. या यंत्रणेत प्रत्येकाने आपल्या घरातील दोन सदस्यांची नोंदणी करून घ्यावी. गाव सीसीटीव्हीच्या नजरेत आणण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेऊन आपले गाव सुरक्षित करा, असेही आवाहन त्यांनी केले.