शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीचे आवर्तन लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 13:27 IST

कुकडी कालवा सल्लागार समितीची पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत काल बैठक झाली. कुकडी क्षेत्रातील येडगाव धरणामधून १० ते १५ एप्रिल दरम्यान आणि पिंपळगाव जोगे धरणातून दोन दिवसात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीगोंदा : कुकडी कालवा सल्लागार समितीची पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत काल बैठक झाली. कुकडी क्षेत्रातील येडगाव धरणामधून १० ते १५ एप्रिल दरम्यान आणि पिंपळगाव जोगे धरणातून दोन दिवसात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रातील शेतक-यांना तब्बल दीड महिन्यानंतर पाणी मिळणार आहे.कुकडीचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी धरणातील पाणीसाठा शिल्लक ची माहिती दिली. पिण्याचे पाणी व फळबागांना एक आवर्तन देऊ शकतो. येडगाव धरणातून पाणी सोडण्याजोगी परिस्थिती नाही. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे म्हणाले, पिंपळगाव जोगे धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यातून कालव्यात पाणी सोडावे. हे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर येडगाव धरणात पाणी सोडावे. माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, २०१२ मध्ये यापेक्षा कठीण परिस्थिती असताना कुकडीतून फळबागा व पिण्यासाठी पाणी सोडले होते. पिंपळगाव जोगे धरणातून पाणी देता येऊ शकते. शेतकरी जगवायचा असेल एकच पाणी द्या. पण फळबागांना द्या. दरवेळेस आम्ही आरोपी आहेत असे समजता. आम्हाला हक्काचे पाणी द्यायचे नसेल तर बैठकीला बोलविता कशासाठी असा संतप्त सवालही पाचपुते यांनी केला. पालकमंत्री राम शिंदे म्हणाले. सध्या साडेसात टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. जून अखेर पिण्याचे पाण्याचा विचार करून १० एप्रिलपासून येडगाव धरणातून पाणी सोडण्यात येईल. यावेळी विधानसभेचे उपसभापती विजय औटी, आमदार दिलीप वळसे, आमदार राहुल जगताप, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार शरद सोनवणे, राजेंद्र नागवडे उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर