नवनागापूरमध्ये पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणी योजना होण्यासाठी २०१५ साली प्रस्ताव दाखल केला. एमआयडीसीने गावासाठी दररोज १५ लाख लिटर व भविष्यात लागणारा वाढीव पाणी कोटा देण्याचे हमीपत्र नवनागापूर ग्रामपंचायतीला दिल्यामुळे योजना पूर्णत्वाला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. योजनेस ५ सप्टेबर २०१९ रोजी तांत्रिक मान्यता प्राप्त झाली. २१ सप्टेबर २०१९ रोजी ९ कोटी ८१ लाख ६७ हजार या किमतीच्या नवनागापूर पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली.
............
४६ किलोमीटरची पाइपलाइन
योजनेत प्रास्तावित केल्यानुसार मल्हारनगर येथे ९ लाख २० हजार लिटर, दांगट मळा येथे ४ लाख ४५ हजार लिटर, आनंदनगर येथे ३ लाख ५६ हजार लिटर, मनोरमा कॉलनी येथे ३ लाख ५६ हजार लिटर क्षमतेच्या एकूण चार उंच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या होणार आहेत. वितरण व्यवस्थेसाठी ४६ किलोमीटरची पाइपलाइन प्रस्तावित करण्यात आली आहे.