शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 01:15 IST

सिन्नर : सिन्नर-घोटी रस्त्यावरील तालुक्यातील बेलू शिवारात शनिवारी (दि.१३) आयपीएल मॅचवर सट्टा लावणाºया इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तिघांसह सुमारे ५ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, सट्टा लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

ठळक मुद्देसिन्नर : ५ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

सिन्नर : सिन्नर-घोटी रस्त्यावरील तालुक्यातील बेलू शिवारात शनिवारी (दि.१३) आयपीएल मॅचवर सट्टा लावणाºया इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तिघांसह सुमारे ५ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असून, सट्टा लावणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांदरम्यान लाइव्ह मॅच पाहून लोकांकडून पैशांची बोली लावून सट्टा खेळणारे व खेळविणाºया इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक सिंह यांनी आदेश केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सिन्नर-घोटी रस्त्यावरील बेलू शिवारात आयपीएल मॅचवर सट्टा लावणाºया इसमांवर छापा टाकून सुमारे ५ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शनिवारी (दि.१३) आयपीएल मालिकेत किंग्स इलेव्हन पंजाब व रॉयल चॅलेंजर बॅँगलोर या संघांचा क्रिकेट सामना सुरू होता.दरम्यान, सिन्नर-घोटी रोडवर एका फार्म हाउसमध्ये सदर सामन्यावर बेटिंग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी सिन्नर-घोटी रोडवर बेलू गावच्या शिवारात मातोश्री फार्म हाउसवर छापा टाकला असता सदर ठिकाणी संशयित प्रेम ताराचंद थावराणी, रा. साई जैन कॉलनी, सौभाग्यनगर, देवळाली कॅम्प नाशिक, हरिश ऊर्फ बॉबी प्रेम थावराणी, रा. सौभाग्यनगर, साईजैन कॉलनी, देवळाली कॅम्प नाशिक व जय अभय राव, रा. मातृछाया अपार्टमेंट, सौभाग्यनगर, देवळाली कॅम्प नाशिक यांना जागेवरच ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेले संशयित हे वरील आयपीएल सामन्यावर त्यांच्या ताब्यातील लॅपटॉप व मोबाइलद्वारे लोकांकडून पैसे लावून व घेऊन सट्टा खेळताना व खेळविताना मिळून आले.सात मोबाइलसह कार, टीव्ही जप्त सदर छाप्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला विविध कंपन्यांचे ७ मोबाइल फोन, १ डेल कंपनीचा लॅपटॉप, १ सोनी ब्राव्हिया कंपनीचा टी.व्ही., १ टाटा स्काय कंपनीचा सेट टॉप बॉक्स तसेच एक फोक्सवॅगन कंपनीची व्हेन्टो कार असा एकूण ५ लाख ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील ताब्यात घेतलेले संशयित इसम हे विनापरवाना बेकायदेशीररीत्या वरील आयपीएल क्रिकेट मॅचवर लोकांकडून मोबाइलवर बुकिंग घेऊन पैसे लावून सट्टा खेळताना व खेळविताना मिळून आले असून, त्यांच्याविरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील संशयीत आरोपी हरिश उर्फ बॉबी थावराणी हा क्रि केट सामन्यांवर बेटींग लावणारा सराईत असून त्याच्यावर यापुर्वी नाशिक शहरातील उपनगर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. आय.पी.एल क्रिकेट सामन्यांवर पैसे लावुन सट्टा खेळणारे इसमांची गोपनीय माहिती काढुन त्यांचेवर यापुढेही अशाच प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने सांगितले. अपर पोलीस अधीक्षक शमिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरिक्षक स्वप्निल नाईक, नवनाथ गुरूळे, रामभाउ मुंढे, रवि शिलावट, दिपक आहिरे, शिवाजी जुंदरे, प्रितम लोखंडे, अमोल घुगे, संदिप हांडगे, हेमंत गिलिबले, निलेश कातकाडे, सचिन पिंगळ, प्रदिप बहिरम, गोकुळ सांगळे यांचा पथकात समावेश होता.