सूचना फोटो: २२ जगताप नावाने आहे.
....
जलवाहिनीची दुरुस्ती सुरूच
अहमदनगर : औरंगाबाद महामार्गावरील वसंत टेकडी ते शासकीय विश्रामगृहापर्यंतच्या दोन्ही बाजूंच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम मंगळवारीही सुरूच होते. माजी नगरसेवक निखिल वारे यांनी दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या. वसंत टेकडीच्या बाजूने हे काम हाती घेण्यात आले आहे.
....
तपोवन रस्त्यावर पाणी
अहमदनगर : तपोवन रस्त्याच्या बाजूने जलवाहिनी टाकण्यात आली असून, या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे स्वप्नपूर्ती चौकात पाणी साचले असून, यामुळे रस्ता खचला आहे. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे.
...
पारिजात चौकात मातीचा ढीग
अहमदनगर : गुलमोहर रस्त्यावरील पारिजात चौकात जलवाहिनी दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्यात आला होता. हा खड्डा बजुविण्यात आला. मात्र, मातीचे ढीग जैसे थे असून, चौकात माती झाली आहे. मातीवरून वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता आहे.