शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

भावीनिमगावात दरोडा; मारहाणीत दोन जखमी

By admin | Updated: June 26, 2014 00:46 IST

शेवगाव : तालुक्यातील भाविनिमगाव परिसरात मंगळवारी मध्यरात्री दरोडेखोराच्या टोळीने धुमाकूळ घातला. देशमुख वस्तीवरील सुधीर जगन्नाथ कबाडी व त्यांच्या भावास मारहाण करून जखमी केले.

शेवगाव : तालुक्यातील भाविनिमगाव परिसरात मंगळवारी मध्यरात्री दरोडेखोराच्या टोळीने धुमाकूळ घातला. देशमुख वस्तीवरील सुधीर जगन्नाथ कबाडी व त्यांच्या भावास मारहाण करून जखमी केले. त्यांच्या घरातून सुमारे एक लाख तीस हजार रुपयांचा मोठा ऐवज घेऊन ही टोळी पसार होण्यात यशस्वी ठरली.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या शेवगाव पोलीस पथकाने दरोडेखोराच्या टोळीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोटारसायकलवरून पळून जाण्यात ही टोळी यशस्वी ठरल्याने पोलीस पथकाच्या कारवाईस यश मिळाले नाही. भाविनिमगाव येथील शेतकरी जगन्नाथ कबाडी हे मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास गड्यासमवेत घरी पोहचल्यानंतर ओट्यावर उभे राहिले असता दरोडेखोराच्या टोळीपैकी काहींनी त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना खाली पाडले व घरातून ऐवज काढून देण्याची इतर सदस्यांना सूचना करावी, अशी दमबाजी सुरू केली. यावेळी एकाच्या गलोलीचा दगड त्यांच्या तोंडावर बसल्याने ते जखमी झाले. घरात असलेल्या पत्नी, भाऊ, मुलगा व सून अशा इतर सदस्यांनी मारू नका, अशी विनवणी करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व काही रोख रक्कम काढून दिल्यानंतर दरोडेखोरांची ही टोळी अंधाराचा फायदा घेऊन निघून गेली. त्यानंतर नगर येथे सिव्हील इंजिनियर असलेल्या सुधीर कबाडी यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून संपर्क साधून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक अजित लकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग चौगुले, पोलीस कर्मचारी संजय बडे, ज्ञानेश्वर माळवे आदींच्या पथकाने घटनास्थळी जावून चोरट्याच्या टोळीचा पाठलाग सुरू केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन ही टोळी मोटारसायकलवरून पसार होण्यात यशस्वी ठरली. या घटनेत दोन जणांना मार लागला असून, त्यांच्यावर नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)दरोडेखोरांची संख्या पाच ते सहा असून ते २५ ते ४० वयोगटातील होते. त्यांनी तोंड बांधलेले होते. ते हिंदी व मराठीतून बोलत होते असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. दरोड्याच्या या घटनेमुळे परिसरात तसेच वाड्यावस्त्यावर वस्तीकरून राहणाऱ्या शेतकऱ्यात चिंतेचे व घबराटीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.