शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या बैठकीत कुकडीच्या आवर्तनावर सकारात्मक निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:21 IST

श्रीगोंदा : मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला दिलेल्या स्थगितीबाबत मंगळवारी मुंबईत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत कुकडी लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक ...

श्रीगोंदा : मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला दिलेल्या स्थगितीबाबत मंगळवारी मुंबईत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत कुकडी लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याचे सांगण्यात येते. जयंत पाटील यांनी याचिकाकर्ते प्रशांत औटी यांचे मन वळवून शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, अशी माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. पाचपुते म्हणाले की, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार रोहित पवार, आमदार अतुल बेनके, संदीप नागवडे उपस्थित होते.

कोणत्याही परिस्थितीत कुकडीचे पाणी सोडावेच लागेल, ही स्पष्ट भूमिका घेतली. ज्या याचिकेमुळे हा विषय लांबला, त्या याचिकाकर्त्यांना आमदार अतुल बेनके यांनी फोन केला. जयंत पाटील हे स्वत: याचिकाकर्त्यांशी बोलले.

पिंपळगाव जोगे धरणासाठी २५ कोटींचा निधी वापरून डेडस्टॉकचे पाणी वापरात आणले जाईल. पाण्याचा प्रश्न कायमचाच मार्गी लागेल. या कुकडी प्रकल्पाचा सर्वांचाच मोठा फायदा होणार आहे, असे पाटील यांनी औटी यांना आश्वासन दिले. त्यामुळे प्रशांत औटी हे आपली याचिका माघार घेणार आहेत. त्यामुळे कुकडीचे आवर्तन तातडीने सुटून सर्वांना पाणी मिळेल, असेही पाचपुते यांनी सांगितले.

...............

डिंभे- माणिकडोह बोगदा व्हावा

डिंभे ते माणिकडोह बोगदा झाला, तर एक आवर्तनाएवढे वाया जाणारे पाणी सहज उपलब्ध होईल. त्यासाठीही अशीच एक बैठक घेऊन तो विषय मार्गी लावावा. त्यामुळे कुकडीचा मोठा प्रश्न सुटून पाण्याची कमतरता जाणवणार नाही, अशी विनंती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना बबनराव पाचपुते यांनी केली.

.........

नागवडेंची प्रतियाचिका

राहुल जगताप, घनश्याम शेलार, बाळासाहेब नाहाटा, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्याप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या सदस्या अनुराधा नागवडे यांनीही प्रतियाचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रश्नात आता अनुराधा नागवडेंनी आता थेट उडी घेतली आहे.

...........

सरोदे मांडणार शेतकऱ्यांची बाजू

कुकडी पाणी प्रकल्प आठमाही असल्याने आवर्तन बंद करावे, असा स्थगिती आदेश गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे, अशी व्यथा मांडणारी हस्तक्षेप याचिका सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. पूर्वा बोरा यांच्यामार्फत दाखल केली आहे. पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यासाठी सरोदे न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू मांडणार आहेत. हस्तक्षेप याचिकेवर मुख्य याचिकेसोबतच सुनावणी घेतली जाईल, अशी माहिती सहकारी वकील अ‍ॅड. अजिंक्य उडाणे यांनी दिली.