अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात रविवारी पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील चार लाख नऊ हजार बालकांना पोलिओ देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.
शहरासह जिल्ह्यातील चार लाख ४० हजार बालकांना पल्स पोलिओ डोस देण्यात येणार आहे. रविवारी दिवसभरात शहरासह जिल्ह्यातील चार लाख नऊ हजार बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला असून, उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील तीन लाख ५६ हजार ८२७ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुटीच्या दिवशीही कामावर हजेरी लावत पोलिओ मोहीम राबिविली. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत शहरातील मोहिमेस सुरुवात करण्यात आली.
...
श्रीरामपूर- २५,४७५
पाथर्डी- १८, ०४३
शेवगाव- २०,२१६
पारनेर- २२,४४९
कर्जत- २०,५२४
जामखेड- १५,४४८
राहाता- २२,९२५
अकोला- २१,४१२
नेवासा- ३२, ७३७
श्रीगोंदा- २६,९९५
अहमदनगर- २६,९९५
राहुरी- २४,२८४
संगमनेर- ४८्र, २१८
कोपरगाव- ३१,१०६
....
नगर शहरात ३९ हजार बालकांना पोलिओ
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नगर शहरातील ३९ हजार २६४ बालकांना पोलिओ देण्यात आला आहे. उर्वरित बालकांना घरोघरी जाऊन पोलिओ डोस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनल बोरगे यांनी दिली.
..
सूचना फोटो आहे.