निंबळक : रांजणी (ता. नगर) येथे श्रमदानातून सातशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. पंचायत समिती सभापती संदीप गुंड व विश्वास बीज ग्रुपचे जगदीश शिंदे यांच्या हस्ते वृक्षाची पूजा करून नारळ वाढवून वृक्षारोपण करण्यात आले.
सरपंच बाळासाहेब चेमटे, उपसरपंच विजय लिपणे यांनी वृक्षारोपणाच्या श्रमदानासाठी आलेल्या पाहुण्यांना गावातील मंदिर परिसर, प्राथमिक शाळा, हायस्कूल, अमरधाम दाखवून गावातील विकास विकास कामांची व मागील तीन वर्षापासून वृक्षारोपण केले, त्याबद्दल माहिती दिली. वड, पिंपळ, आवळा, चिंच, कडूनिंब, जांभूळ, करंज आदी झाडे लावली आहेत. या उपक्रमात विश्वास बीज ग्रुप सहकारी, जीएसटी ग्रीन आर्मी अधिकारी नगर, साई क्रांती ट्रॅक्टर्स एमआयडीसी, इनोव्हेशन कंपनी, राजमुद्रा ट्रान्सपोर्ट, किशोर इंडस्ट्रीज कबीर केक्स नगर, अभिषेक जाधव, नागर फाउंडेशन रवळगाव, पाणी फाउंडेशन टीम, बॉस्को ग्रामीण केंद्र, श्री ज्ञानोदय विद्यालय रांजणी, वृक्षमित्र, ग्रामपंचायत आदी सहभागी झाले.