शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना खुणावतोय भंडारदऱ्याचा जलोत्सव

By admin | Updated: July 3, 2017 15:22 IST

काळ्याभोर ढगांतून बरसणारे पावसाचे टपोरे थेंब़़़ ओल्याचिंब झालेल्या डोंगररांगा़़ गिरीशिखरांहून कोसळणारे पांढरे शुभ्र प्रपात़़ तुडूंब भरलेली भातखाचरे अन् थुई थुई नाचणाऱ्या जलधारा़

राजूर : काळ्याभोर ढगांतून बरसणारे पावसाचे टपोरे थेंब़़़ ओल्याचिंब झालेल्या डोंगररांगा़़ गिरीशिखरांहून कोसळणारे पांढरे शुभ्र प्रपात़़ तुडूंब भरलेली भातखाचरे अन् थुई थुई नाचणाऱ्या जलधारा़़़ दुथडी भरून वाहणारे ओढेनाले़़़ हिरवीगार दुलई पांघरलेला निसर्ग असा भंडारदरा परिसरातील मनोहारी जलोत्सव पर्यटकांना खुणावतोय़ निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण केलेला भंडारदरा धरणाचा परिसर पर्यटकांना आकर्षित करीत आहे. जुलै महिन्याचे कॅलेंडर उघडल्यानंतर सुरु होणारा जलोत्सव चालतो आॅगस्ट अखेरपर्यंत. गेल्या चार-पाच दिवसांपासून या परिसरात धो-धो पाऊस बरसत असल्यामुळे येथील जलोत्सवास सुरुवात झाली आहे.राजूर सोडले की दहा किलोमीटरच्या अंतरावर रंधा धबधब्यापासूनच पर्यटनस्थळांना सुरुवात होते. हा धबधबा मोठ्या प्रमाणात वाहण्यास सुरुवात झाली नसली तरी येथे बांधलेले पादचारी पूल पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. धरणाच्या पाणलोटाच्या रिंगरोडच्या एका बाजूला असणारी सह्याद्रीची उंचच उंच पर्वत रांग, ओल्याचिंब झालेल्या या डोंगर रांगावरून उड्या मारीत पायथ्याकडे येणारे धबधबे व नेकलेस फॉल, नाणी फॉल, पांजरे फॉल आदी मोठे प्रपात, ओढ्या नाल्यांना आलेले नदीचे रूप पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.घाटघर परिसरात टपोऱ्या थेंबानी येणारी पावसाची सर. या सरीमागे कोकण कड्याच्या पायथ्याकडून येणारे दाट धुके, त्या पाठोपाठ येणारी वाऱ्याची झुळूक व पुन्हा पाऊस असा खेळ येथे सुरु आहे. दाट धुक्यात लपटलेली गिरीशिखरांची टोके पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात आणि यात भर घालतो तो येथील तजेला आलेला हिरवागार निसर्ग. या जोडीला अमृतेश्वराचे मंदिर, धो-धो वाहू लागलेली साम्रदची सांदण दरी असे एक ना अनेक पर्यटन स्थळे जलोत्सवात भर घालत आहेत. भंडारदरा परिसरात हा जलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांची पावले आता ओढ घेऊ लागली आहे. पर्यटक पावसात चिंब भिजण्याबरोबरच इथला निसर्गही डोळ्यांत साठवित आहेत.