शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

देवस्थानच्या भूमिकेने कावडींनाही प्रवेश बंद

By admin | Updated: April 7, 2016 00:04 IST

बाळासाहेब शेटे, सोनई शिंगणापूर येथील शनिचौथऱ्यावरील प्रवेशाचा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

बाळासाहेब शेटे, सोनईशिंगणापूर येथील शनिचौथऱ्यावरील प्रवेशाचा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कावडीधारक चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाच्या स्वयंभू शिळेवर गंगाजल अर्पण करतील, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे तर दुसरीकडे कोणालाही चौथऱ्यावर जाऊ देणार नसल्याचा भूमिका देवस्थान ट्रस्टने घेतली आहे़ जर पुरुष चौथऱ्यावर जाणार असतील तर महिलाही चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतील असा पवित्रा भूमाता रणरागिणी महिला संघटनेच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घेतला आहे़ गुढीपाडव्याच्या दिवशी कुणालाही चौथऱ्यावर जाऊ देणार नसून एका स्टीलच्या टबमध्ये गंगाजल टाकून ते इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने चौथऱ्याखालूनच शनिदेवाच्या शिळेवर अर्पण केले जाईल, असे धोरण शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त आणि प्रशासनाने घेतले आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पोलीस प्रशासन मात्र पुरते गोंधळून गेल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी नेवासे तालुक्यातील प्रवरासंगम आणि श्रीक्षेत्र काशी येथून गंगाजल कावडीद्वारे आणून ते शनिदेवाच्या शिळेवर अर्पण केले जाते़ या सर्व कावडीधारकांना या दिवशी चौथऱ्यावर जाऊ देण्याची भूमिका शिंगणापूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी घेतली आहे. मात्र, यासंदर्भात देवस्थान विश्वस्त आणि प्रशासनाशी संपर्क साधला असता, दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीत कोणालाही चौथऱ्यावर जाऊ दिले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. ‘कावडीधारकांचा हिरमोड होऊ नये, यासाठी त्यांना चौथऱ्यावर जाऊ द्यावे. यामुळे होणाऱ्या परिणामांना सर्व ग्रामस्थ सामोरे जाण्यास तयार आहेत’, अशी भूमिका सरपंच बाळासाहेब बानकर, बाळासाहेब बोरुडे, सयाजी शेटे, गोरख शेटे, भाऊराव शेटे यांनी मांडली. एकूणच शनिशिंगणापूर चौथऱ्याचा वाद मिटण्याची चिन्हे दिसून न येता, हा वाद आणखी वाढत चालला आहे.देवस्थान विश्वस्त आणि प्रशासनाची या संदर्भात बैठक बोलविण्यात आली, त्यावेळी एकाही ग्रामस्थाला विश्वासात घेण्यात आले नसल्याचा आरोप सरपंच बानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.