शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बाेठे करायचा माझ्या आईचा शारीरिक, मानसिक छळ

By | Updated: December 8, 2020 04:18 IST

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजयामाला माने यांच्यानंतर मयत जरे यांच्या कुटुंबीयांनीही ...

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजयामाला माने यांच्यानंतर मयत जरे यांच्या कुटुंबीयांनीही पोलीस संरक्षणाची मागणी केल्याने पोलिसांची जबाबदारी आणखी वाढली आहे. जरे यांचा मुलगा रुणाल भाऊसाहेब जरे यांनी सोमवारी (दि.७) जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना याबाबत निवेदन दिले आहे. हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याने माझ्या आईचा अनेकदा शारीरिक व मानसिक छळ केला आहे. त्याच्यापासून आमच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका असून, पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी रुणाल याने निवेदनात केली आहे.

या निवेदनात रुणाल जरे याने म्हटले आहे की, बोठे याचे आमच्या घरी नेहमी जाणे-येणे असायचे. तो माझी आई रेखा यांना नेहमी जीवे मारण्याची धमकी द्यायचा. तू नाही तर तुझ्या मुलांना जिवंत सोडणार नाही, असे बोलायचा. त्याची आमच्या कुटुंबावर मोठी दहशत होती. त्यामुळे आम्ही कुणीच त्याच्याविरोधात बोलत नव्हतो. माझ्या आईने यापूर्वी त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात अर्जही दिले आहेत. बोठे यानेच माझ्या आईचे हत्याकांड करून तो फरार झाला. माझ्यासह माझी आजी सिंधूबाई सुखदेव वायकर, वडील भाऊसाहेब रामनाथ जरे, भाऊ कुणाल, माझी पत्नी आकांक्षा अशा सर्वांच्या जीविताला बोठे अथवा त्याच्या हस्तकांपासून धोका आहे.

---------

बोठे गुंड प्रवृत्तीचा

जातेगाव घाटात माझ्या आईची हत्या झाली तेव्हा त्या ठिकाणी आजी सिंधूबाई व भाऊ कुणाल आईसोबत होते. हे दोघे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. बोठे हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याने आधीही आम्हाला संपवून टाकण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. आमच्या कुटुंबीयांचे काही बरेवाईट झाल्यास त्यास सर्वस्वी बाळ बोठे हाच जबाबदार असल्याची नोंद घ्यावी. तसेच आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे, अशीही मागणी रुग्णाल यांनी या निवेदनातून केली आहे.

--------

आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात अटक असलेल्या पाच आरोपींपैकी आदित्य सुधाकर चोळके व फिरोज राजू शेख यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, तर सागर उत्तम भिंगारदिवे, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे व ऋषीकेश ऊर्फ टप्या वसंत पवार यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या सर्व आरोपींना सोमवारी तपासी अधिकारी अजित पाटील यांनी पारनेर न्यायालयात हजर केले होते. यावेळी पाटील यांनी बाळ बोठे याने रेखा जरे यांच्या हत्येसाठी सागर भिंगारदिवे याला किती सुपारी दिली होती. याची माहिती घ्यायची आहे. तसेच या गुन्ह्यासंदर्भात काही सीसीटीव्ही फुटेज तपासणी व मुद्देमाल जप्त करणे बाकी असल्याने आरोपींना आठ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती.

----------

नाशिकमधील हॉटेलमध्ये लपला होता बोठे

नगरमधून पसार झाल्यानंतर बोठे हा नाशिकमधील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. ही बाब पोलिसांना समजली तेव्हा तेथे तत्काळ एक पथक पाठविण्यात आले. बोठे मात्र पोलीस दाखल होण्याच्या आधीच हॉटेलमधून पसार झाला होता. गेल्या तीन ते चार दिवसांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत आहे.