शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी शहरातील लोक खेड्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:21 IST

सध्या केवळ सरकारी लसीकरण केंद्रावरच लसीकरण सुरू आहे. या केंद्रांना ही अगदीच किरकोळ लसीचे वितरण होत आहे. त्यातही नियमितपणाच ...

सध्या केवळ सरकारी लसीकरण केंद्रावरच लसीकरण सुरू आहे. या केंद्रांना ही अगदीच किरकोळ लसीचे वितरण होत आहे. त्यातही नियमितपणाच नाही. लसीकरण करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे.

कोरोनाच्या प्रकोपामुळे नागरिकच नाही तर राज्य व केंद्र सरकारही हादरले आहे. कोरोनापासून बचाव करायचा असेल तर लसीकरण हाच खात्रीचा व अंतिम उपाय असल्याने प्रत्येकजण लस टोचून घेण्यासाठी आसुसलेले आहे.

शहरातील व सुशिक्षित नागरिक चपळाई करून ऑनलाईन नोंदणी करत आहेत. नोंदणीचे अ‍ॅप ओपन झाल्यावर अवघ्या काही मिनिटात लसीचा कोटा संपत आहे. दुसरीकडे खेड्यापाड्यातील लोक पहाटेपासूनच लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. मात्र अनेकांच्या नशिबी निराशाच येत आहे. ऑनलाईन पद्धत असल्याने अनेकजण खेड्यापाड्यातील किंवा अन्य तालुक्याच्या ठिकाणच्या सेंटरवर नोंदणी करत असल्याने खेड्यापाड्यातील केंद्रावर बाहेरून आलेले अनेकजण लसी घेताना दिसत आहे.

.....................

सलग दोन दिवस चार-चार तास कॉम्प्युटरवर बसलो. नाव टाईप करायच्या आत, काही मिनिटात कोटा संपत होता. सततच्या प्रयत्नानंतर नेवासा फाटा इथे नंबर लागला. तिथे लस घ्यायला गेलो तेव्हा तिथे माझ्यासारखे अनेकजण बाहेर गावाहून आले होते, काहीजण तर पुण्यातून आलेले होते. लसीकरण नोंदणी ऑनलाईन असली तरी तालुक्यातील लोकांनाच करता यायला हवी

- प्रमोद गोंदकर, सामाजिक कार्यकर्ता.

.............

आमच्याकडे लोक पहाटे पाच पासून रांगा लावत होते. साडेसहा वाजता जितक्या लस तितके टोकन वाटण्यात येत असे. रांगा लावणाऱ्यांपैकी जवळपास पन्नास टक्के लोकांनाच लस मिळायची. बुधवारपासून केवळ केंद्राच्या कार्यकक्षेतील गावातील नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाईल. शिर्डीच्या नागरिकांना राहाता ग्रामीण रूग्णालयात दुसऱ्या डोससाठी जावे लागेल.

- डॉ. संजय गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र