शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST

अहमदनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात शिक्षक भारती संघटना जिल्हा कार्यकारिणीची ऑनलाइन मीटिंग ...

अहमदनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात शिक्षक भारती संघटना जिल्हा कार्यकारिणीची ऑनलाइन मीटिंग शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सहविचार सभेत अहमदनगर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यासाठी शिक्षक भारती संघटनेचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत, असे संघटनेचे सरचिटणीस महेश पाडेकर यांनी सांगितले.

वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भातील समस्या डी.सी.पी.एस. पावत्या न मिळणे, १ तारखेला पगार न होणे, सातवा वेतन आयोग पहिला हप्ता अद्याप काही शिक्षकांना न मिळणे, शालार्थ आय.डी. त्वरित देणे, विनाअनुदानित अपात्र शाळांना त्वरित अनुदान देणे, सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती करणे, सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे, शासनाने कोरोनासारख्या महामारीत शिक्षकांना कॅशलेस मेडिकल योजना आणणे, शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊनही अद्याप काही शिक्षकांना पूर्ण वेळ वेतनश्रेणी मान्यता न मिळणे, कनिष्ठ महाविद्यालयाची संचमान्य ता २०१८-१९ प्रमाणे ठेवणे, डी.सी.पी.एस. खात्याचा हिशोब देऊन ती रक्कम एन.पी.एस. मध्ये त्वरित वर्ग करणे, तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना मानधन वाढवणे व नवीन शिक्षक भरतीत प्राधान्य द्यावे, अर्धवेळ शिक्षकांना महागाई भत्ता, घरभाडे, सेवा शाश्वती देणे, नवीन शैक्षणिक धोरणातील संभ्रम दूर करणे यांसारख्या अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा सहविचार सभेत झाली.

सभेसाठी राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप उच्च माध्यमिक विभागाचे सरचिटणीस महेश पाडेकर, जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, डॉ.किशोर डोंगरे, मनोहर राठोड, तालुकाध्यक्ष संभाजी पवार, जिल्हा हिशोब तपासणीस सोमनाथ बोंतले, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष सचिन जासूद, महिला अध्यक्ष आशा मगर, रूपाली कुरुमकर, माध्यमिक विभागाचे सचिव विजय कराळे, कैलास राहणे, श्याम जगताप, दिनेश शेळके, प्रवीण मते, संजय तमनर, रोहिदास चव्हाण, बाबासाहेब लोंढे, सुदाम दिघे, हनुमंत रायकर, कैलास जाधव, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे, सिकंदर शेख, हर्षल खंडिझोड, अशोक अन्हाट, संभाजी चौधरी, मोहंमद समी शेख, श्रीकांत गाडगे, सूर्यकांत बांदल, जॉन सोनवणे, बाळासाहेब शिंदे, रेवन घंगाळे, प्रशांत कुलकर्णी, एम.पी. शिर्के, हनुमंत बोरुडे, प्रकाश मिंड, मधुकर नागवडे, महादेव कोठारे, संतोष देशमुख, योगेश हराळे, काशीनाथ मते, रामराव काळे आदी उपस्थित होते.