पारनेर : शालेय क्रीडा स्पर्र्धांमध्ये अनेक माध्यमिक विद्यालये सहभाग घेत नाही. त्यामुळे चांगल्या खेळाडुंना क्षमता असुनही सहभागी होता येत नाही. स्पर्धंत सहभागी नसणाऱ्या विद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस करणार असल्याचे क्रीडाधिकारी सुधीर चपळगांवकर यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. येत्या पाच आॅगस्टपासून या शालेय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होत आहे.स्पर्धा नियोजनासाठी बैठकपारनेर तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनाची बैठक पारनेर न्यू इंग्लिश स्कूल येथे क्रीडा संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूराव होळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यानंतर क्रीडाधिकारी पत्रकारांशी बोलत होते. पारनेर तालुक्यात अनेक गुणवंत खेळाडू ग्रामीण भागातून येऊन राष्ट्रीय पातळीवर गेले आहेत. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यानेच त्यांची गुणवत्ता पुढे आली हे लक्षात घेतले पाहिजे असे ते म्हणाले. पारनेर तालुक्यात सुमारे सत्तर माध्यमिक विद्यालये असताना अवघ्या दहा ते पंधरा शाळाच यात सहभागी होतात. यामुळे क्रीडा क्षेत्रात गुणवंत खेळाडू असल्यास ते वंचीत राहतात. याचा तोटा विद्यार्थ्यांसह पालकांना होत असल्याने त्यांनी मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक व पालक यांनी संयुक्त यात लक्ष देऊन सहभाग वाढविला पाहिजे, असे ते म्हणाले.क्रीडा संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूराव होळकर म्हणाले, पारनेर तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धांना पाच आॅगस्टपासून सुरवात होत असून पारनेर तालुका क्रीडा संकुलावर या खो-खो, कबड्डी मैदानी स्पर्धा होणार आहेत. व्हॉलीबॉल स्पर्धा सेनापती बापट विद्यालय पारनेर व कुस्ती पारनेर महाविद्यालयात होणार आहे. यंदापासून उशिरा येणाऱ्या संघांना बाद ठरविले जाणार आहे. न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या उषा रोहोकले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी दिलीप दुधाडे, सुनील गायकवाड, बाळासाहेब मते, बाबाजी शिंदे, शाहुराव औटी, दत्तात्रय औटी, बाबुराव औटी, महादेव साबळे, बाळासाहेब गाडेकर, रविशंकर मोरे, एकनाथ आंबेकर, दत्तात्रय उंडे आदी हजर होते. (तालुका प्रतिनिधी)स्पर्धेचे वेळापत्रकसर्व वयोगट-खो-खो- ९ आॅगस्ट मुली,११,१२- मुले, १३ पायका ग्रामीण, कबड्डी- आॅगस्ट- ५ मुली, ६,७ मुले, ८-ग्रामीण, कुस्ती-सप्टेंबर ४ मुली, ५,६ मुले, हॉलीबॉल- १२,१३ सप्टेंबर , १५ सप्टेंबर ग्रामीण, मैदानी-२९ सप्टेबर मुले, ३० सप्टे मुली, १ आॅक्टोबर ग्रामीण.
स्पर्धेसाठी उदासीन विद्यालयांवर होणार दंडात्मक कारवाई
By admin | Updated: July 21, 2014 00:29 IST