शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

उसाचे पेमेंट द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:34 IST

टिळक भोस- संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष यांचा इशारा -श्रीगोंदा तालुक्यातील नागवडे/जगताप/साजन शुगर देवदैठण हे तिन्ही कारखाने चालू होऊन दोन महिने ...

टिळक भोस-

संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष यांचा इशारा

-श्रीगोंदा तालुक्यातील

नागवडे/जगताप/साजन शुगर देवदैठण हे तिन्ही कारखाने चालू होऊन दोन महिने झाले. तिन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालू असून, लाखो टन गाळप आजरोजी केले आहे. नियमानुसार ऊस तोडणीननंतर पंधरा दिवसांत उसाचे एफआरपी देणे कायद्याने बंधनकारक आहे, तरीही श्रीगोंदा तालुक्यातील व नगर जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी अजूनही उसाचे पेमेंट दिलेले नाही.

नगर जिल्ह्यातील सर्वच सहकारी/खासगी कारखान्यांकडे करोडो रुपये

थकले आहेत. जगताप (कुकडी) कारखाना व साईकृपा हिरडगाव यांची आरआरसीची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यावर पुढे जप्तीची कारवाई करण्यात आली नाही.

यंदा चालू गळीत हंगामापूर्वी जुने देणे व व्याज देणे गरजेचे होते. मात्र, तेसुद्धा अजून दिले गेले नाही.

कुकडी सहकारी (जगताप) कारखान्याकडून

मागील हंगामाची ५०० रुपये प्रतिटन अशी अनेक शेतकऱ्यांची थकबाकी येणे आहे. शेतकरी मेटाकुटीला आले तरी माजी आमदार राहुल जगताप (चेअरमन) यांच्याकडून करोडो रुपये येणे आहे, तसेच माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुत्र व कुटुंबीय यांच्या मालकीच्या साईकृपा हिरडगाव कारखाना यांच्याकडून अजूनही शेतकऱ्यांचे व वाहतूकदारांचे थकीत पेमेंट येणे आहे. या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला तरीही या चालू गळीत हंगामातील बाकी अजून मिळाली नाही. त्यामुळे ११ डिसेंबर रोजी प्रादेशिक साखर सहसंचालक अहमदनगर यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. मागील वर्षी टिळक भोस व त्यांचे सहकाऱ्यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते व आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानासमोर ९० दिवस ठिय्या आंदोलन केले होते. तसेच अनेक दिवस थकीत पेमेंटसाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला होता. तालुक्यातील प्रमुख नेते असलेल्या पाचपुते, जगताप, नागवडे कारखान्यांकडील थकीत पेमेंटमुळे तालुक्यातील शेतकरी मेटेकुटीला आला आहे, हे मात्र खरे. यंदा अतिरिक्त ऊस उत्पादनामुळे शेतकरी उघडपणे बोलत नसला तरी देखील कारखानदारांवर नाराज असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम नागवडे-जगताप या साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीवर नक्की होऊ शकतो.