शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

शास्तीच्या थकबाकीत अंशत: सवलत

By admin | Updated: August 13, 2015 23:12 IST

अहमदनगर : महापालिकेचा वसुलीचा टक्का वाढविण्यासाठी आयुक्तांनी शास्तीच्या थकबाकीत अंशत: सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

अहमदनगर : महापालिकेचा वसुलीचा टक्का वाढविण्यासाठी आयुक्तांनी शास्तीच्या थकबाकीत अंशत: सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी सवलत देऊनही अपेक्षित वसुली झाली नाही. त्यामुळे माफीचा हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त विलास ढगे यांनी आदेशात म्हटले आहे. मालमत्ता, संकलित व इतर कराची वसुली नियमित व प्रभावीपणे होण्यासाठी शासनाने महापालिका अधिनियमात सुधारणा करून दोन टक्के शास्ती लागू करण्याचा निर्णय घेतला. तथापि या शास्तीत अंशत: अथवा पूर्णत: माफ करण्याचा अधिकार आयुक्तांना बहाल केला आहे., २०१० पासून अर्थिक वर्षाच्या शेवटी शास्ती करात सवलत देऊनही अपेक्षित वसुली झाली नाही. त्यामुळे आयुक्तांनी आॅगस्टपासूनच ७५ टक्के शास्तीमाफीचा निर्णय घेतला. आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे विलंबाने जे कर भरतात त्यांना शास्तीमध्ये सवलत देणे हे आर्थिक वर्षाच्या पहिल्या व दुसऱ्या सहामाहीच्या प्रारंभी कालावधीत शास्तीसह कर भरणाऱ्या करदात्याच्या दृष्टीने नैसर्गिक न्यायाचे नाही. ही बाब कर वसुलीस व थकबाकी वसुलीस प्रोत्साहन देणारी नाही. सवलत देऊनही शंभर टक्के वसुली होत नसल्याने कर व थकबाकीच्या रकमेत वर्षानुवर्षे वाढ झाल्याचे दिसते. त्यातच एलबीटी रद्द झाल्याने महापालिकेसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी आॅगस्टमध्येच शास्तीमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. तीन महिने शास्ती करात टप्प्याटप्प्याने सवलत मिळणार आहे. (प्रतिनिधी)