कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार राधाकिसन ठोंबरे होते.
पाराजी कुलांगे यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार केला. एकतीस वर्ष सहा महिने त्यांनी पवित्र ज्ञानदानाचे काम केले. सत्काराला उत्तर देताना कुलांगे यांनी प्रदीर्घ सेवेतील विविध अनुभव सांगून ग्रामस्थांचे आभार मानले. यावेळी त्यांनी विद्यालयास एक्कावन्न हजार रुपयांची मदत जाहीर केली. यापुढेही विद्यालयास मदत करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.
याप्रसंगी दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक अनिल ठोंबरे, राज्य पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त उत्कृष्ट शिक्षक रमाकांत बोठे, बाजार समितीचे माजी संचालक रमेश ठोंबरे, माजी सरपंच विलास घिगे, गहिनीनाथ पिंपळे, सुखदेव नवले, माजी विद्यार्थी आदींनी कुलांगे यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शरद घिगे, सचिव भिवसेन घिगे, सर्व संचालक मंडळ, शिक्षक, कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रमेश सुपेकर, सुभाष घिगे, सरोज पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक बलभीम कराळे, हसीना शेख यांनी केले. सूत्रसंचालन सुलभा आकडकर यांनी केले. ज्ञानसुख घिगे आभार मानले.
...
फोटो-०२कुलांगे सत्कार
..
ओळी- तांदळी वडगाव (ता.नगर ) धर्मनाथ विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक पाराजी कुलांगे यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समवेत उपस्थित मान्यवर.