शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

राहाता, कोपरगाव तालुक्यात ऑक्सिजनची आणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:21 IST

एकीकडे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने शिर्डी, राहाता व कोपरगावातील रुग्णालयांनी ऑक्सिजन आवश्यक असणारे पेशंट अ‍ॅडमिट ...

एकीकडे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने शिर्डी, राहाता व कोपरगावातील रुग्णालयांनी ऑक्सिजन आवश्यक असणारे पेशंट अ‍ॅडमिट करून घेणे थांबवले आहे, तर अन्य रुग्णांना इतरत्र हलवण्याच्या सूचना रुग्णालयांनी नातेवाइकांना दिल्या आहेत. ज्या रुग्णालयांकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत त्यांच्याकडे सौम्य व मध्यम ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे. मात्र, गंभीर रुग्णांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिर्डी, कोपरगाव, राहाता येथे संगमनेर येथून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा होतो. कोपरगावला दोन सब एजन्सी असून त्यांना सिन्नर, संगमनेरमधून पुरवठा होतो. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून हा पुरवठा थांबवण्यात आला आहे. संगमनेर येथील रुग्णालयांनाही पुरेसा ऑक्सिजन मिळेनासा झाल्याने संगमनेरकरांनी ऑक्सिजन देणे थांबवले आहे. यामुळे कोपरगाव व राहाता तालुक्यातील रुग्णालयेच व्हेंटिलेटरवर गेली आहेत. यातील काही रुग्णालयांकडे सायंकाळपर्यंत तर काहींकडे रात्रीपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे.

प्रांताधिकार गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे हे ऑक्सिजन मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. पाठपुराव्यानंतर नगरवरून थोडे सिलिंडर मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

..................

ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संगमनेरच्या पुरवठादाराने नकार दिला आहे. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला आहे. ते ५० सिलिंडर देणार आहेत. काही दिवस रोज पुरवठा करण्याबाबत त्यांना विनंती केली आहे. पोकळे यांच्या प्लांटला लिक्विड मिळवण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

-गोविंद शिंदे, प्रांताधिकारी