कर्जत : श्रमदान करून स्वच्छता करण्याच्या अनुषंगाने कर्जत शहरात स्वच्छता जनजागृतीसाठी भव्य मशाल फेरी काढण्यात आली. यामध्ये विविध सामाजिक संघटना व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अग्रभागी ज्येष्ठ श्रमप्रेमी मशाल घेऊन सहभागी झाले होते. सर्वात पुढे चालण्याचा मान नगर पंचायतच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना देण्यात आला. त्यामागे संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या वेषातील मुले रथावर होती. त्या मागे दादा पाटील एनसीसीचे कँडेट टीम, साईकृपा ॲकॅडमीचे विद्यार्थी, आम्ही कर्जतचे सेवेकरीचे श्रमप्रेमी सहभागी झाले होते. मशाल फेरी विविध भागातून जात शेवटी शहाजीनगर येथे सांगता झाली. या ठिकाणी सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कर्जत नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी या अभियानाची माहिती दिली.
-------
फोटो - १६मशाल फेरी
कर्जत शहरातून स्वच्छता जनजागृतीसाठी मशाल फेरी काढण्यात आली.