शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भाव गडगडताच बंद पाडला कांदा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:51 IST

शेवगाव : येथील बाजार समितीत सोमवारी सकाळी झालेल्या लिलावात कांद्याला दर कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते. ...

शेवगाव : येथील बाजार समितीत सोमवारी सकाळी झालेल्या लिलावात कांद्याला दर कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते.

काही वेळानंतर भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे व बाजार समितीचे सभापती ॲड. अनिल मडके, सचिव यांनी दर वाढविण्याच्या मध्यस्थीने पुन्हा लिलाव सुरू झाले.

बाजार समितीच्या आवारात नेहमीप्रमाणे सोमवारी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, कडा, आष्टी, धामणगाव आदी ठिकाणाहून शेतकऱ्यांचा कांदा विक्रीसाठी आला होता. दुपारी १२ वाजता कांदा लिलाव सुरू झाला असताना व्यापाऱ्यांनी एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटल २ हजार ३०० ते २ हजार ६०० रुपये असा कमी दराने लिलाव सुरू केला. दोन व तीन नंबर कांद्याच्या भावालाही गळती लावली. इतर ठिकाणी झालेला लिलाव पाहता हे दर न परवडणारे असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. त्यांनी हा लिलाव बंद पाडले.

याबाबत काही शेतकऱ्यांनी माजी आ. चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याशी संपर्क साधला. घुले यांनी फोनवर भाव वाढून देण्याबाबत व्यापाऱ्यांना तंबी दिली, तर अरुण मुंडे यांनी तातडीने बाजार समितीला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व व्यापाऱ्यांसोबत भाववाढ देण्याबाबत चर्चा केली.

बाजार समितीचे सभापती अनिल मडके, सचिव अविनाश म्हस्के यांनीही व्यापाऱ्यांना भाववाढीच्या सूचना दिल्याने लिलाव पूर्ववत सुरू झाले.

फेरलिलावात एक नंबर कांद्याचा ३ हजार ते ३ हजार २००, दोन नंबर कांद्याला २ हजार ६०० ते २ हजार ९०० तर तीन नंबरला १ हजार २०० असा लिलाव झाला. येथे ८ हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती.

फोटो ओळी ११ शेवगाव कांदा

शेवगाव बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला होता.