शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

एक रात्र सैन्य भरतीच्या स्वप्नाची

By admin | Updated: April 11, 2017 14:19 IST

पाठीवर बँगा घेऊन पायी अंतर कापत दररोज अडीच ते तीन हजार मुलांचा हा प्रवास गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे.

नवनाथ खराडे, अहमदनगर : रात्रीचे अकरा साडेअकरा वाजण्याची वेळ. बसस्थानकावरुन बालिकाश्रम रोडमार्गे मुलांचे घोळके न्यू आर्टस महाविद्यालयाच्या दिशेने येताणाचे चित्र. पाठीवर बँगा घेऊन पायी अंतर कापत दररोज अडीच ते तीन हजार मुलांचा हा प्रवास गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे. सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे ध्येय बाळगत सकाळपासून सुरु झालेला हा प्रवास संपतो तो दुस-या दिवशी सकाळीच. देशसेवा करण्यासाठी असंख्य अडचणींचा सामना करत रात्रभराच्या प्रवासांचा लोकमत टीमने घेतलेला हा आढावा.गेल्या पाच दिवसांपासून अहमदनगर शहरातील न्यू आट्स कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालय व पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सैन्य भरती प्रक्रिया सुरु आहे. अहमदनगर, बीड, लातूर ,उस्मानाबाद व पुणे जिल््ह्यातील तरुणांनासाठी ही संधी आहे. १७ एप्रिलपर्यत चालणा-या भरतीसाठी पाच जिल्ह्यातील तब्बल ३२ हजार मुलांनी जीडी, ट्रेडमन, क्लॉर्क पदांकरीत आॅनलाईन नोंदणी केली आहे. एकाच दिवशी गोंधळ न व्हावा म्हणून जिल्ह्यानुसार दिवस देण्यात आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत शहरात दररोज रात्रीच्या सुमारास तीन ते साडेतीन हजार मुले येत आहेत. सकाळी नऊ वाजेच्या आत मैदानी चाचणी पुर्ण करण्यात येत असल्याने मुले लवकरच गरर्दी करतात. पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास न्यू आटर्स महाविद्यालयाच्या बालिकाश्रम रस्त्यावरील गेटवरुन प्रवेश दिला जातो.अनेकजण आदल्या दिवशी सकाळीच घरुन निघतात. ब-याचजण प्रवास करत नगर गाठतात. काही जण स्पेशल वाहने करुन येतात. बसस्थानकावर उतरल्यानंतर शोध सुरु होतो तो भरतीच्या मैदानाचा. बसस्थानकापासून सुमारे तीन किलोमीटरचे अंतर असल्याने वेळेचे भान ठेवत अनेकजण घोळक्याने विचारपूस करत बालिकाश्रम परीसरात पोहोचतात. रात्री उशीर झालेले मुले न चुकण्यासाठी रिक्षाने पोहोचतात. अनेकजण दिल्लीगेटजवळ उतरुन मैदान जवळच असल्याने मिळेल त्या ठिकाणी आपला मुक्काम ठोकतात. मग ती जागा कोणतीही असो उराशी सैन्यभरतीचे स्वप्न बाळगलेल्या तरुणांना फरक पडत नाही. नेमके किती वाजता मैदानात प्रवेश दिला जाणार आहे याची माहिती नसल्याने अनेकजण रात्री अकरा वाजल्यापासूनच गेटवर रांगा लावतात. रांगेत आपलाच पहिला नंबर असावा यासाठी गेटच सोडत नाहीत. पुर्र्वी भरतीचा अनुभव असणारे मात्रयापासून अलिप्त राहतात.यामागे सैन्यात भरती होणे एवढेच स्वप्न असते.घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेकजण सैन्यभरतीचा मार्ग निवडतात. अख्खे कुटुंब शेतीवर अवंलबून असल्याने परवड होत असल्याने नोकरीच्या माध्यमातून देशसेवा करणे कधीही चांगले अशा भावनाही तरुण व्यक्त करतात. सैन्याची नोकरी सन्मानजनक असतेच पण सोयी-सुविधाही चांगल्या असतात. त्यामुळे सैन्यात जाण्याची इच्छा असल्याची भावना तरुण व्यक्त केल्या.भरतीसाठी सकाळपासून सुरु झालेला प्रवास दुस-या दिवशी सकाळी संपतो. नगरपासून १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरुन हा भरतीचा प्रवास सुरु होतो. घरचा डबा बांधून सकाळीच नगरच्या दिशेने निघायचे. एसटी किंवा अन्य मार्र्गाने बसस्थानक गाठायचे. मैदानाच्या दिशेने वेळ असेल तर पायी नाहीतर रिक्षाने मैदान गाठायचे. वेळेचे भान ठेवत जागा मिळेल तिथे झोपायचे. सकाळी सुरु केलेला प्रवास रात्री अकरा वाजेच्या दरम्यान मैदानाच्या प्रवेश गेटजवळ स्थिरावतो. तहान लागली की जवळील दुकानातून पाण्याची बाटलीचा आधार घ्यावयाचा. भूक लागलीच तर थोडीसी बिस्किटे पोटात टाकायची. जेवण करायचे टाळायचे. मैदानी चाचणी काही तासांवर येऊन ठेपल्याने भरपेट खाण्याचे टाळायाचे. कोल्ड्कीक किंवा इतर पेयांनी शरीराला आधार देण्याचे काम मुले करतात. जसजशी रात्र वाढत जाते तसतशी गरर्दी होत जाते. सुमारे तीन ते साडेतीन हजार मुलांनी हा परिसर गजबजून जातो. याठिकाणी प्रवेश पत्राविषयी माहिती जाणून घेतात. अनेकांकडे प्रवेश पत्रांची एकच प्रत असल्याने झेरॉक्स काढतात. अनेकांजवळ फोटोही नसतात त्यामुळे फोटो काढण्यासाठी धावपळ केली जाते. फोटो मिळाल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडतात. रात्री अकरा वाजल्यापासून प्रतिक्षेत असलेल्या तरुणांना पहाटे अडीच ते तीन वाजता आतमध्ये प्रवेश दिला जातो. तोपर्यत चार ते पाच तास रस्त्यावरच मुक्काम असतो. यादरम्यान दडपण वाढतजाते. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर कागदपत्राती तपासणी केली जाते. मैदानी चाचण्या घेतल्या जातात. या विविध टप्प्यादरम्यान बाद झालेल्या तरुणांचा हात लाल रंगामध्ये बुडवतात. लाल हात झालेला तरुण निराश न होता पुढील भरतीच्या ठिकाणचा हाच प्रवास पुन्हा करतात. ज ेयशस्वी होतात ेस्वप्न साकारल्याचा आनंद साजरा करतात.