आश्वी : मोटारसायकलची जोरदार धडक बसल्याने रक्तस्त्राव होऊन तरूणाचा मृत्यू झाला. गुरूवारी दुपारी हा अपघात झाला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. कारखान्यात शेतकी विभागात कार्यरत असलेले संजय शांत्वन ब्राह्मणे (वय ४२) हे नेवासा येथील शेतकी विभागात काम करत होते.तेथे शेतकऱ्यांच्या भेटी घेण्यासाठी ते गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पायी जात असताना पाठीमागून आलेल्या मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर मोटारसायकलस्वार पळून गेला. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, चार भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. आश्वी बु. अमरधाममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्यासह मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. (वार्ताहर)
मोटारसायकल धडकेत एक ठार
By admin | Updated: September 20, 2014 23:21 IST