शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील केबलधारकांची संख्या घटली

By admin | Updated: July 29, 2016 17:55 IST

अहमदनगर : सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर शहरातील केबलधारकांची संख्या वाढली आहे़

अहमदनगर : सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर शहरातील केबलधारकांची संख्या वाढली आहे़ मात्र बहुविध परिचालक यंत्रणांनी ही आकडेवारीच लपविण्याचा प्रयत्न चालविला असून, ही बाब जिल्हा करमणूक शाखेच्या निदर्शनास आली आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने फरकाची रक्कम भरण्याबाबतची नोटीस गुरुवारी बहुविध यंत्रणांना गुरुवारी बजावली आहे़ शहरासह जिल्ह्यातील केबलधारकांना सेट टॉप बॉक्स बसविणे सरकारने बंधनकारक केले आहे़ सेट टॉप बॉक्स न बसविणाऱ्या केबलधारकांचे दूरचित्रवाणी मध्यंतरी बंद करण्यात आले होते़ त्यामुळे या मोहिमेला गती मिळाली आहे़ परिणामी सेट टॉप बॉक्स बसविल्यानंतर केबलधारकांची संख्या वाढणे अपेक्षित होते़ अपेक्षेप्रमाणे केबलधारकांची संख्या १५वरून २२ हजार झाली़ तशी माहिती केंद्र सरकारकडून जिल्हा करमणूक शाखेस कळविण्यात आली आहे़ करमणूक कर वसुलीसाठीही ही आकडेवारी गृहीत धरली जाणार आहे़ असे असले तरी बहुविध परिचालक यंत्रणांनी यापेक्षाही कमी आकडेवारी सादर केली असून, सुमारे ३ हजार केबलधारकांचा फरक आहे़ प्रति केबलधारक ४५ रुपये, याप्रमाणे कर वसूल करण्यात येतो़ परंतु बहुविध यंत्रणांनी संख्या घटविल्यामुळे जिल्हा करमणूक शाखेने बहुविध यंत्रणांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे़ त्यामुळे प्रत्यक्षातील आकडेवारी सादर करणे बंधनकारक झाले असून, यामुळे करमणूक करात मोठी वाढ होणार असल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले़ केबलधारकांची संख्या कमी दाखवून लाखो रुपये कर बुडविण्यात आला आहे़ मात्र आॅनलाईन प्रणालीमुळे कर बुडेगिरीला आळा बसला आहे़ सेट टॉप बॉक्स बसविण्यापूर्वीची आणि त्यानंतरची संख्या, याचा हिशोब सध्या सरकारकडून मांडला जात आहे़ सरकारची आकडेवारी आणि बहुविध यंत्रणांनी बसविलेले सेट टॉप बॉक्स, ही संख्या सारखी, आल्यानंतरच यातील त्रुटी दूर झाल्या आहेत, असे म्हणण्यास वाव आहे़ परंतु, तसे होताना दिसत नाही़ अपेक्षेप्रमाणे केबलधारकांची संख्या वाढली खरी, पण बहुविध यंत्रणांनी ती कमी दाखविल्याने पहिले पाढे पंचावन्न, अशी स्थिती निर्माण झाली असून, बहुविध यंत्रणांना नोटिशीव्दारे विचारणा करण्यात आली आहे़ त्यावर बहुविध यंत्रणा काय उत्तर देतात, यावरच पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार आहे़ (प्रतिनिधी)