बोटा : संगमनेर तालुक्यातील सारोळेपठार येथे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंज-यात सावज म्हणून ठेवलेल्या कोंबड्या मुंगसानेच फस्त केली.सारोळेपठार येथे काही दिवसांपासून बिबट्याचा संचार वाढला आहे. त्याच्या हल्ल्यात पाळीव प्राणी ठार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बारा दिवसांपूर्वी रात्री शेतातील विद्युत पंप सुरु करून दुचाकीवरुन घरी परतणा-या दोन तरुणांचा बिबट्याने पाठलाग केला. प्रसंगावधान राखत या तरुणांनी पळ काढल्याने ते थोडक्यात बचावले. दरम्यान बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी सारोळेपठार ग्रामपंचायतीने वनविभागाकडे केली. यानंतर तातडीने येथे पिंजरा लावला. सावज म्हणून कुत्रा ठेवला परंतु बिबट्या पिंज-यात अडकला नाही. बकरी उपलब्ध न झाल्याने त्या ऐवजी भक्ष्य म्हणून कोंबड्या ठेवल्या. मात्र बिबट्याऐवजी मुंगसानेच या कोंबड्या फस्त केल्या.
बिबट्याने नाही... मुंगसाने खाल्ल्या कोंबडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 14:56 IST