शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

गटातटाचा नव्हे मी जिल्ह्याचा पालकमंत्री

By admin | Updated: March 4, 2016 00:02 IST

अहमदनगर : मंत्री व नेता हा एखाद्या गटातटाचा असतो ही परंपरा या जिल्ह्यात पडली आहे. मला ही परंपरा मंजूर नाही.

अहमदनगर : मंत्री व नेता हा एखाद्या गटातटाचा असतो ही परंपरा या जिल्ह्यात पडली आहे. मला ही परंपरा मंजूर नाही. माझा स्वत:चा असा कोणताच गट नाही. पक्ष सांभाळतानाच मंत्री म्हणून विरोधकांची कामेही मी तितक्याच गंभीरपणे करतो. केवळ बोलणे व स्वप्न दाखविणे हा माझा स्वभाव नाही. हळूहळू जिल्ह्यात होत असलेली कामे जनतेला दिसतील. या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून दाखवू, असे ठाम प्रतिपादन गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले. शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्तीप्रमुख सुधीर लंके यांनी त्यांचे स्वागत केले. शिंदे यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. सविस्तर मुलाखतीमध्ये अनेक प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. तर काही प्रश्नांवर सूचक भाष्य केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यावेळी त्यांच्यासमवेत होते. प्रश्न : आजच जिल्ह्यात काकडी विमानतळावर पहिले विमान उतरले. आता हा जिल्हा विकासाचे उड्डाण कधी घेणार? पालकमंत्री- आमच्याच सरकारने १०० कोटी दिल्यामुळे हे विमानतळ मार्गी लागत आहे. सहा महिन्यात ते पूर्ण क्षमतेने सुरू होईल. रेल्वे अर्थसंकल्पात मनमाड-दौंड मार्गाच्या दुहेरीकरणाची घोषणा झाली आहे. ही विकासाची सुरुवात आहे. आमच्या सरकारचा कृतीवर भर आहे. प्रश्न : पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील कोणता प्रश्न आपण प्राधान्याने हाती घेतला आहे? उत्तर : सिंचनाचा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. कुकडी, निळवंडे, वांबोरी चारी आणि ताजनापूर उपसा (लिफ्ट) जलसिंचन योजनेची कामे पूर्ण करण्याचे माझ्यासमोर ध्येय आहे. या प्रकल्पांची कामे वेळेत न झाल्याने अंदाजपत्रक कोट्यवधी रुपयांनी वाढले आहे. शेतकरीही नुसतेच आशेवर आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आम्ही आजच बैठक घेतली. बजेटपूर्वी सिंचन प्रकल्पांच्या प्रश्नांवर सर्व आमदारांसह जिल्ह्यात प्रथमच अशी बैठक झाली. महाजन यांनी निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. चारही प्रकल्पांची कामे सोबत पुढे जावीत असा प्रयत्न आहे. प्रश्न: नगर शहरातील उड्डाणपुलाचे काय? उत्तर: मंत्री झाल्यानंतर मी या प्रश्नावर मंत्रालयात बैठका घेतल्या आहेत. मात्र उड्डाणपुलासाठी मोठ्या निधीची गरज आहे. नगर शहरातून जाणारी वाहतूक वळविण्यासाठी बाह्यवळण रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याला आपण प्राधान्य दिले. पूर्वी बाह्यवळण रस्त्यांची अवस्था दयनीय होती. या रस्त्यांच्या मजबुतीकरणामुळे पुणे, औरंगाबाद व सोलापूरहून येणारी बहुतांश वाहतूक बाह्यवळणमार्गेच जाते. लोक या रस्त्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे शहरावरचा वाहतुकीचा ताण कमी झाला आहे. तरीही उड्डाणपूल व्हावा अशी जनतेची मागणी आहे. त्याबाबत काय करता येईल, याचा विचार सुरु आहे. मतदारसंघात नेते संपल्याने धस आले !प्रश्न : आजकाल माजी मंत्री सुरेश धस यांची तुमच्या मतदारसंघात लुडबूड वाढली आहे.शिंदे : धस निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. त्यामुळे माझ्याविरुद्ध बोलल्याशिवाय त्यांना प्रसिद्धी तरी कशी मिळणार? माझ्या मतदारसंघात नेतेच संपल्याने बाहेरच्या लोकांना येऊन नेतृत्व करावे लागतेय हे काय कमी झाले? प्रश्न: तुम्ही अहिल्यादेवींचे वंशजच नाहीत, असा आरोप त्यांनी केलाय.शिंदे: याबाबत मी योग्यवेळी बोलेल. त्यांनी काय आरोप करावेत हा त्यांचा प्रश्न आहे. धस यांचा पूर्वइतिहास सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत मी काय बोलू. प्रश्न: जामखेड नगरपरिषदेत चमत्कार घडविणार असे तुम्ही म्हणाला होतात.शिंदे: हो. चमत्कार घडला आहे. धस यांना शिवसेनेची माणसे सोबत घेण्याची गरज का पडली? राष्ट्रवादीचे बहुमत असताना अपक्षाला नगराध्यक्षपद द्यावे लागले. शिवसेनेला दोन समित्या द्याव्या लागल्या. एक स्वीकृत नगरसेवकपद द्यावे लागले.राष्ट्रवादीला आता काय उरलेय?विखेंचे माझ्यावर प्रेमप्रश्न : बाळासाहेब विखे यांनी तुमचे कौतुक केले आहे. याचा काय अर्थ घ्यायचा? शिंदे: त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. मी पालकमंत्री झालोे तेव्हा माझा सर्वपक्षीय सत्कार झाला होता. असे सहसा घडत नाही. माझ्यानंतर विखे विरोधी पक्षनेते झाले तेव्हा त्यांचाही असाच सत्कार झाला. गटातटात मला रस नसल्याने सर्वच लोक माझ्यावर प्रेम करतात. प्रश्न: जिल्हा विभाजनाबाबत आपली भूमिका काय? उत्तर : क्षेत्रफळाने आपला जिल्हा मोठा आहे. जिल्ह्याचे विभाजन व्हावे ही लोकांची इच्छा आहे. मात्र पूर्वी नव्या जिल्ह्याचे केंद्र ठरत नव्हते त्यामुळे जिल्हानिर्मिती रखडली आहे. प्रश्न: तुम्ही नवीन जिल्ह्याचे कोणते केंद्र ठरवलेय? उत्तर: नव्या जिल्ह्याच्या मुख्यालयावरुन पूर्वी वाद होता. भाजपा सरकारचा मंत्री म्हणून केंद्र ठरविणे ही माझ्यासाठी मोठी समस्या नाही. प्रश्न: पण, हे केंद्र ठरणार कधी? उत्तर: लवकरच ठरेल. प्रश्न: नगर शहराच्या विकासाकडे पूर्वीच्या मंत्र्यांप्रमाणेच तुमचेही दुर्लक्ष होतेय असे नाही वाटत ? उत्तर : एमआयडीसी, उड्डाणपूल, बाह्यवळण रस्ता हे शहराशी संबंधित प्रश्न नाहीत काय? बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न आपण सोडवलाय. एमआयडीसीत साडेचार कोटीचा कौशल्य विकास प्रकल्प उभारला जात आहे. तेथे सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तुम्ही म्हणत असाल तर शहराच्या विकासात आणखी लक्ष घालू. त्याची सुरुवात भाजपा शहराध्यक्षाच्या निवडीपासून करता येईल (मिश्किलपणे) प्रश्न: तुम्ही पालकमंत्री म्हणून नगर महापालिकेला अद्याप भेट दिलेली नाही.उत्तर: महापालिकेत विरोधकांची सत्ता आहे. त्यांनी कधी बोलविले नाही. मात्र, शहराची जी कामे माझ्याकडे आली ती मी सोडवली आहेत. कुठल्याही कामात अडवणूक केलेली नाही. प्रश्न: महापालिकेत चाळीस कोटीच्या निधीवरुन भांडणे सुरु आहेत? उत्तर: हो. राष्ट्रवादीची सत्ता आहे म्हणून सेना-भाजपच्या नगरसेवकांची कामे होऊ द्यायची नाही ही भूमिका चूक आहे. त्यामुळेच या निधीला आमच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतलाय. हा प्रश्न समन्वयाने सुटावा असा आपला प्रयत्न आहे. मात्र तोडगा मान्य करायलाही हे लोक तयार नाहीत. महापौर पदाची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ही भांडणे सुरु आहेत. प्रश्न: गृहमंत्री म्हणून नगर शहरात आपण पोलीस आयुक्तालय करणार का? उत्तर: महापालिका असलेल्या शहरांत पोलीस आयुक्तालय झाले पाहिजे, असे सरकारचे धोरण आहे. म्हणूनच नगरलाही आयुक्तालय करण्याचा प्रस्ताव तयार आहे. माझे सहकारी असलेले दुसरे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी अकोला शहरासाठी आयुक्तालय मंजूर केले आहे. त्यानंतर कोल्हापूरचा क्रमांक आहे. नगरचा विचार त्यानंतर होईल. पोलिसांच्या संख्याबळाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. मंजूर संख्येच्या पन्नास टक्के पोलिसांची भरती होणार आहे. नगर जिल्ह्यात शंभर ते सव्वाशे जागा रिक्त आहेत, त्यापैकी पन्नास जागा भरल्या जात आहेत. प्रश्न: शिर्डी संस्थानच्या नियुक्त्या का होत नाहीत ? उत्तर: संस्थानच्या विश्वस्त नियुक्तीबाबत न्यायालयाचाही सरकारला आदेश आलेला आहे. हा आदेश आपण अद्याप पाहिलेला नाही. पण या नियुक्त्या लवकरात लवकर होतील. शिर्डी येथील साई समाधी शताब्दी महोत्सवासाठी आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.प्रश्न: चारा-छावण्यांबाबत काय धोरण आहे?उत्तर: जिल्ह्यात चारा उपलब्धतेबाबतचा अहवाल शासनाला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यात चारा-छावण्या सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. दक्षिण नगर जिल्ह्यासाठी कुकडी धरणातून आवर्तन सोडण्याबाबत लवकरच प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील प्रशासन उत्तम आहे. चुकीचे काहीच होत नाही. शिस्त आणि नियमाच्या बाहेर जायचे नाही, याबाबत अधिकारी सतर्क आहेत.पोलीस खाते आवडतेतुमच्याकडे विविध खाती आहेत, यातील कोणते खाते तुमचे आवडते आहे, असे विचारल्यानंतर गृहराज्यमंत्री शिंदे म्हणाले, अर्थातच पोलीस खाते़ मला फौजदार व्हायचे होते़ पण आता पोलिसांचा मंत्री झालो़ धनगर आरक्षणाची पूर्तता करणार धनगर आरक्षणाचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही, असा प्रश्न केला असता शिंदे म्हणाले, या प्रश्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. सरकार याबाबत अभ्यास करत आहे. मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूटला याबाबत संशोधन करण्याचे काम दिले आहे. ही संस्था धनगर समाजाच्या इतिहासाची सखोल माहिती घेत आहे. धनगर हे आदिवासी होते का, धनगर व धनगड यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे, याचाही शोध सुरु आहे़ आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेला तर तिथे टिकाव लागला पाहिजे यासाठी हे संशोधन सुरु आहे. युतीच्या सत्ताकाळातच धनगर समाजाला आरक्षण लागू होईल़ नगर शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी बांधिल जिल्ह्यातील नेत्यांनी आपापले किल्ले सांभाळले. अहमदनगर या मुख्यालयाला कोणी नेता मिळाला नाही. तुम्ही मंत्री म्हणून शहराचे पालकत्त्व घेणार का? असा प्रश्न केला असता, या शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण बांधिल आहोत. नाट्यगृहाचे काम महापालिकेकडून सुरु आहे. कोठे काही कमतरता असेल तर आपण सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करु, असे ते म्हणाले.