शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांना जिल्ह्यात नाही थारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:15 IST

ग्रामीण भागात बोगस डाॅक्टरांचा नेहमीच सुळसुळाट असतो. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाईचा इशारा दिल्याने जिल्ह्यात एकही बोगस डॉक्टर ...

ग्रामीण भागात बोगस डाॅक्टरांचा नेहमीच सुळसुळाट असतो. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाईचा इशारा दिल्याने जिल्ह्यात एकही बोगस डॉक्टर आढळून आला नाही. मात्र, तक्रार नसल्याने कारवाई केली नसल्याचे प्रशासनाने म्हणणे आहे. तक्रार आली तरच कारवाईची भूमिका असल्याने जिल्ह्यातही बोगस डॉक्टरांचे ‘चोरी चोरी चुपके चुपके’ धंदा सुरू असण्याचीच शक्यता आहे. वैद्यकीय शिक्षणात कुठलीही पदवी मिळविली की, स्वत:च्या नावापुढे डाॅक्टर लावण्याची कायद्यानेच परवानगी मिळते. मात्र, स्वत:चे मूळ शिक्षण लपवून अनेक जण एमबीबीएस, बीएएमएस असल्याचे भासवितात. ग्रामीण भागात त्याची फारशी शहानिशा कोणी करत नसल्याने हा प्रकार अलीकडच्या काळात अधिकच फोफावला आहे. अशा बोगस डाॅक्टरांमुळे मात्र वेळप्रसंगी रुग्णांचा जीवही धोक्यात सापडतो. त्यामुळे चुकीच्या प्रकारावर नियंत्रणासाठी धडक मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

------------

तक्रार आली तरच कारवाई

ग्रामीण भागातील अधिकांश गावांमध्ये बोगस डाॅक्टर्सकडून रुग्णांवर उपचार केले जात असण्याची शक्यता आहे. मात्र प्रशासनाकडून असे बोगस डॉक्टर शोधण्याची कोणतीही मोहीम आतापर्यंत राबविली गेली नाही. कोरोनाच्या काळात डॉक्टरांची मोठी मदत प्रशासनाला हवी होती. त्यामुळे कारवाई, मोहीम, बोगस डॉक्टर शोधण्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे कोरोनाच्या उपाययोजनामध्ये अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी प्रशासनाने घेतल्याचे दिसते आहे.

-----

दवाखान्यात जाण्यापूर्वी खात्री करा

१) एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली कंम्पाउडर किंवा परिचारक म्हणून काम केलेल्या काही व्यक्तींनी बोगस दवाखाने उघडल्याचे गेल्या काही वर्षांत समोर आले आहे. काेठून तरी बनावट प्रमाणपत्र मिळवायचे आणि स्वतःचा दवाखाना सुरू करायचा, अशी त्यांची कार्यपद्धती असते. थोडेफार संशयित वातावरण वाटल्यास दवाखाना दुसऱ्या शहरात स्थलांतरित करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करून बक्कळ पैसा ते कमावतात .

२) काही वर्षे तज्ज्ञांच्या हाताखाली काम केलेले असल्याने हे बोगस डॉक्टरही त्यांच्या इतकेच तज्ज्ञ असतात. साध्या सर्दी तापापासून लहान सहान शस्त्रक्रिया ते सहज करू शकतात. त्यामुळे बोगस डॉक्टर ओळखणे कठीण असते.

३) अशावेळी वैद्यकीय प्रमाणपत्र हेच त्यांना बोगस सिद्ध करण्याचे प्रमुख हत्यार असते. रुग्णांनी डॉक्टरकडे जाण्यापूर्वी पुरेपूर खात्री करून घ्यावी. खोट्या प्रमाणपत्र आधारे प्रॅक्टिस करणारा औषधांची नावे किंवा आजाराचे वैद्यकीय नाव उच्चारताना बऱ्याचदा गफलत करतो. असा प्रकार तुमच्यासोबत घडल्यास तत्काळ पोलीस स्थानकात कळवा.

..........

कोरोना काळात किती बोगस डॉक्टरांची धरपकड – ००

विनापरवाना सुरू असलेल्या दवाखान्यांवर कारवाई - ००

डमी- ८४९