शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला लागेना दूषित पाण्याचा शोध

By admin | Updated: September 2, 2014 23:29 IST

अहमदनगर: दूषित पाणीपुरवठा का होतो, याचा महापालिकेला अद्याप शोध लागलेला नाही़

अहमदनगर: आगरकरमळा परिसरात दूषित पाणीपुरवठा का होतो, याचा महापालिकेला अद्याप शोध लागलेला नाही़ एक महिना उलटूनही दूषित पाण्याचा शोध सुरूच असून, मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांनी स्टेशन रस्त्यावरील पंचशीलवाडी परिसरात शोध मोहीम राबिवली़ परंतु हाती काहीच न लागल्याने शोध मोहीम गुंडाळण्यात आली़ गेल्या एक महिन्यापासून कावीळ रोगाने स्टेशन रस्ता परिसरात थैमान घातले आहे़ या रोगाने आतापर्यंत दोघांचा बळी घेतला आहे़ हा रोग का व कसा आला,याचा अद्यापही महापालिकेला शोध लागला नाही़ रेल्वेस्टेशन परिसरातील पंचशीलवाडी, अचानक वस्ती, भोवरीचाळ, जयभिम वसाहत, आगरकरमळा आणि संजयनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे़ हे दूषित पाणी पिल्याने नागरिक कावीळ रोगाने त्रस्त असल्याकडे नगरसेवक विजय गव्हाळे यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले़ त्यांनी ही बाब महापालिका आयुक्तांसह सर्वच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली़ मात्र महापालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही़ वारंवार मागणी करूनदेखील एकही अधिकारी तिकडे फिरकला नाही़ याविषयी गव्हाळे यांनी आयुक्तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली़ तक्रारीचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द होताच मंगळवारी सकाळी महापालिकेचे अधिकारी पंचशीलवाडी परिसरात दाखल झाले़ त्यांनी दूषित पाण्याचा शोध घेतला़ विविध ठिकाणचे पाण्याचे नमुने घेऊन गटारीचे पाणी जलवाहिनीत कसे जाते, याचा शोध घेतला़ तसेच तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून,शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे़महापालिका प्रशासनाने दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी जलकुंभाची सफाई केली़ परिसरातील गटारी व जलवाहिनी तपासल्या़ परंतु अद्याप याचे कारण महापालिकेच्या पथकाला सापडले नाही़ अनेकवेळा शोध मोहीम हाती घेऊन महापालिकेच्या हाती काहीच लागत नाही़ पण दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींत वाढ होत आहे़ पंचशीलवाडीतील नळांना पिवळे पाणी येत आहे़ या पाण्यात लाल आळ्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़ दूषित पाणीपुरवठा बंद करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली असून, पावसामुळे दूषित पाणी येण्याचे प्रमाण वाढतच आहे़ दूषित पाण्याने साथीच्या रोगांची लागण होत आहे़ ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)मंगल कार्यालयासमोर पाणी दूषित औरंगाबाद- पुणे महामार्गावरील एका मंगल कार्यालयासमोर गटारीचे पाणी जलवाहिनीत झिरपते़ मात्र याठिकाणी उपाययोजना न करता दुसरीकडेच शोध मोहीम सुरू आहे़ महापालिकेची शोध मोहीम भरकटल्याने चिंता व्यक्त होत आहे़