शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडे धरण ओव्हरफ्लो

By admin | Updated: September 3, 2014 23:58 IST

राजूर/अकोले: गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी भंडारदरा धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे प्रवरा पात्रातील निळवंडे धरणही आज सकाळी साडेसात वाजता तुडूंब भरले.

राजूर/अकोले: गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी भंडारदरा धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे प्रवरा पात्रातील निळवंडे धरणही आज सकाळी साडेसात वाजता तुडूंब भरले. दुपारी दोन वाजता धरणाच्या भिंतीवरून पाणी प्रवरा पात्रात झेपावले.यावर्षी पंधरा आॅगस्टपूर्वी भंडारदरा धरण भरले. यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना निळवंडे भरण्याची उत्सुकता होती. मात्र पंधरा आॅगस्टनंतर पाणलोटातील पाऊस मंदावला आणि निळवंडे भरण्याची प्रतिक्षाही ताणली. रविवारपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाने जोरदार कमबॅक केले आणि भंडारदरा ओव्हरफ्लो होत सुमारे ४ हजार २०० क्युसेकपर्यंत पाणी सोडावे लागले. बुधवारी सकाळी निळवंडे काठोकाठ भरले.निळवंडे धरणाच्या भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. या भिंतींच्या मधोधम नदीपात्रापासून ६४१.५० मीटर तलांकावर सहा लोखंडी वक्र दरवाजे बसविणे बाकी आहे. त्यामुळे यावर्षी धरणात ६ हजार ५३२ दशलक्ष घनफूट पाणी साठविण्यात येणार आहे. रात्रीपासून भंडारदऱ्याच्या पाणलोटात पाऊस कमी झाल्याने धरणातून सोडण्यात येत विसर्गही कमी झाला. सकाळी १ हजार ४२१ क्युसेकचा विसर्ग सुरू होता तर निळवंडेतून १ हजार २०० चा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या भिंतीवरून पाणी पडत नव्हते. (वार्ताहर)पाण्याची आवक कमीबुधवारी दुपारी १२ वाजता भंडारदरा धरणाचे वक्र दरवाजेही बंद करण्यात आले त्यामुळे निळवंडेत येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली. अखेर दुपारी १२ वाजता धरणाच्या भिंतीवरून ६५ क्युसेकने पाणी प्रवरा पात्रात पडू लागले आणि निळवंडे ओव्हरफ्लो झाले.