लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्सच्या माईक या एकांकिकने सातवा नटश्रेष्ठ शाहू मोडक करंडक जिंकत स्पर्धेवर वर्चस्व निर्र्माण केले तर संगमनेर महाविद्यालयाच्या अतिक्रमण डिल या एकांकिकेस दुसरा क्रमांक मिळाला. पेमराज सारडा महाविद्यालयाच्या ट्राफिक या एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकावला. जेष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण माऊली सभागृहात रविवारी करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव पदमाकर केस्तीकर, कल्पतरु फिरोदिया एन्टरप्रायजेसचे गौरव फिरोदिया, प्रतिभा मोडक, सुलभा मोडक, परिक्षक राहुल बेलापूरकर व संकेत पावसे उपस्थित होते.दोन दिवस सावेडीतील माऊली सभागृहात कलायात्रिक व नाट्यजल्लोेष आयोजित आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्र्धा संपन्न झाल्या. दोन दिवसांत तब्बल १५ एकांकीका सादर करण्यात आल्या. सर्र्वाधिक बक्षीसे संगमनेर महाविद्यालयाने पटकावली. दिग्दर्शनामध्येही संगमनेर महाविद्यालयाच्या अतिक्रमण एकांकिकेसाठी प्रशांत त्रिभुवन यास प्रथम पुरस्कार मिळाला तर पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मोनिका बनकर हिस ट्राफिक एकांकिकेसाठी द्वितीय क्रमांक मिळाला. स्त्री अभिनयामध्ये अहमदनगर महाविद्यालयाच्या स्नेहा पटेलने बाजी मारली. तर पुरष अभिनयात अतिक्रमण डिल साठी तुषार गायकवाड यास प्रथम क्रमांक मिळविला.सविस्तर निकाल :सांघिक विजेते -प्रथम : माईक, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगरव्दितीय : अतिक्रमण डील , संगमनेर महाविद्यालय, संगमनेरतृतीय : ट्रॅफीक, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगरदिग्दर्शन :प्रथम : प्रशांत त्रिभुवन (अतिक्रमण)व्दितीय : मोनिका बनकर( ट्रॅफीक)स्त्री अभिनय -प्रथम : स्नेहा पटेल ( अहमदनगर महाविद्यालय)व्दितीय : प्रियांका काळापाहाड ( ट्रॅफीक)उत्तेजनार्थ : शर्वरी अवचट(शब्द-निशब्द), दीपाली येणारे ( स्मशानाचं उदघाटन), श्वेता पारखी(दीमडी)पुरुष अभिनय :प्रथम : तुषार गायकवाड(अतिक्रमण)व्दितीय : संकेत जगदाळे ( माईक)उत्तेजनार्थ : प्रतीक तांबे ( मजहबी), विशाल साठे ( ट्रॅफीक), शुभम गाडे ( दीमडी)
रंगभूषा - वेशभूषा : सोनल उदावंत , अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय,संगमनेरसंगीत : सिध्दार्थ खंडागळे, दीमडीप्रकाशयोजना : गणेश ससाणे, अल्पविराम (श्रीरामपूर) नेपथ्य : हरिष भोसले, दीमडी लेखन : तुषार गायकवाड, अतिक्रमण डिललक्षवेधी अभिनय : विराज अवचिते (माईक)वाचिक अभिनय : शमा देशपांडे ( लागण)