कल्याण रोडवरील लोंढे मळा येथे पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, लक्ष्मीबाई लोंढे, माधुरी लोंढे, वृषाली लोंढे, अरुण होळकर, मुकुंद पाथरकर, संजय सुपेकर, गोविंद शिंदे, बाळासाहेब नलगे, रंजना नन्नवरे, ज्योती सुपेकर, अरुणा वागस्कर, रमेश लोखंडे, पुष्पा केळगंद्रे आदींची उपस्थिती होती.
यावेळी संग्राम जगताप म्हणाले की, कल्याण रोड हे नगर शहराचे एक उपनगर आहे. या भागाचा झपाट्याने विकास होत आहे. नागरिकांनी पुढे येऊन वृक्षारोपण व संवर्धन करणे गरजेचे आहे. भविष्यकाळातील पर्यावरणाबाबत होणारे धोके टाळण्यासाठी वृक्षसंवर्धन चळवळ राबविणे ही खरी काळाची गरज आहे.
...